You are currently viewing उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण

उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम लेख*

*उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण*

ध्वनी लहरी म्हणजेच…
आवाजाच्या स्त्रोतापासून कानांपर्यंत जाणारे हवेच्या रेणूंचे कंपन…!
साधारणतः ८० डेसिबल(डीबी) पर्यंत आवाजाची तीव्रता मनुष्य सहन करू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे १०० डीबी आवाज काही तास सतत कानांच्या पडद्यावर आदळला तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल उत्सवांमध्ये मोठमोठ्या आवाजात लावले जाणारे लाऊडस्पीकर, डीजे, डॉल्बी यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते.
“आपण दुसऱ्यांपासून वेगळे किंवा दुसऱ्यांपेक्षा मोठे, शिरजोर कसे” असं काहीतरी जगाला दाखविण्यासाठी जगावेगळे करण्याच्या नादात माणूस काय करतो..? त्याचा आपल्यावर किंवा इतरांवर काय परिणाम होतो..? याचा विचार न करता अनेकजण चुकीच्या गोष्टी करतात, समर्थन देतात यातीलच एक म्हणजे ध्वनी प्रदूषण..!
“प्रदूषण” मग ते ध्वनी, जल, वायू वा अन्य कोणत्याही प्रकारचे असो दुष्परिणामकारकाच..! वातावरणात मोटारी, विमाने, रेल्वे वाहतूक, कारखाने, राजकीय सभा, खेळ या मधून मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते. परंतु हे ध्वनी प्रदूषण ठराविक कालावधीसाठी असते. परंतु दीर्घकाळ त्रासदायक असते ते सण समारंभातील लाऊडस्पीकर, मिरवणुकीतील कर्णकर्कश डिजे, डॉल्बी, फटाके आणि गाड्यांचे वाजवले जाणारे हॉर्न..! दीर्घकाळ चालणाऱ्या गणेश मिरवणुकीत होणारी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे, बेंजो, डिजे आदींचे आवाज १०० डेसिबल पेक्षा जास्त क्षमतेने आवाज करतात तर अलीकडे ईद आदी सणांच्या मिरवणुकीत देखील लाऊडस्पीकर, मोटारींच्या हॉर्नचे आवाज देखील १०० डेसिबल मर्यादा पार करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाला सामोरे जावे लागते.
“दुसऱ्याने केले तर ते प्रदूषण अन् तेच आपण केलं तर दुसऱ्यांनी सहन करून दुर्लक्ष करावा, किंवा एकदाच करतो..कधीतरी केलं तर काय होतं..? आमचा सण आहे..” अशी एक ना हजार कारणे पुढे केली जातात. खरतर प्रदूषणाला जात, धर्म, पंथ काही नसतो.. सण हिंदू, मुस्लिम अथवा इतर कुणाचाही असो..प्रदूषण निषिद्धच..! त्यांच्या मशिदीवर रोज भोंगे वाजतात, आमच्या मिरवणुकीत वर्षातून एकदा डिजे, डॉल्बी वाजवला तर काय फरक पडतो..? प्रत्येक बाबतीत केलेला असा भेदभाव आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विचारातून “ध्वनीप्रदूषण” जन्मास येते म्हटल्यास वावगे ठरू नये. सर्वप्रथम समाजात ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करताना माणसांच्या “विचार प्रदूषणावर” बोलणे, जनजागृती करणे आवश्यक आहे. विचारांमध्ये जागृती झाली की आपोआप प्रत्येक प्रकारचे पदूषण मानव जातीकडून कमी होईल यात तीळ मात्र शंका नाही.
ध्वनी प्रदूषणाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वसामान्य माणूस विचार देखील करू शकत नाही एवढ्या समस्या ध्वनीच्या अवाजवी वाढलेल्या लहरींमुळे निर्माण होतात आणि त्यातून सुटका करून घेताना दमछाक होते. अवांछित आवाजातील ध्वनी प्रदूषण शारिरीक आणि मानसिक आरोग्याला धोका पोचवू शकते. सामान्यतः चिडचीड, उच्च तणाव पातळीमुळे आक्रमकता, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचनक्रिया बिघडणे, नाडीचे ठोके वाढणे, गर्भपात, बहिरेपणा, निद्रानाश, कानांच्या संवेदनशील केसांच्या पेशींना नुकसान होऊन तात्पुरते किंवा कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होणे, पडद्याला इजा होणे अशा अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. माणसाच्या कार्यक्षमतेत सुद्धा घट होते.
अभ्यास करणाऱ्या मुलांचे लक्ष विचलित होणे, तणाव वाढणे, मानसिक थकवा, आळस येणे, आणि मुख्य म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात आणि मुलांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
ध्वनी प्रदूषणाचा दुष्परिणाम केवळ मानव जातीला होत नसून वन्यजीव, प्राणी, कीटकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही कीटक, बेडूक, पक्षी, वटवाघूळ असे प्राणी अनेक कारणांसाठी केवळ आवाजावर अवलंबून असतात. परंतु ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या काही प्राणी विशिष्ट आवाज काढून संवाद साधून जोडीदाराला आकर्षित करण्यावाचून वंचित राहतात. कीटकांना भक्षक, अन्न शोधण्यासाठी व्यत्यय येतो.
उत्सव कोणत्याही जाती धर्माचा असो…प्रत्येकाने आपल्याला काय आवडते, चांगले वाटते यापेक्षा इतरांना आपण करतो ते किती आवडेल..? त्यांना आनंद मिळेल की त्रास होईल याचा विचार केला तर नक्कीच उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. देवाला आपण श्रद्धेने, भक्तिभावाने पुजतो त्यावेळी मधुर आवाजातील घंटानाद करतो, तो भगवंताला श्रवणीय असतो मग त्याच भगवंताला मिरवणुकीने विसर्जित करताना वाजवलेले फटाके, कर्णकर्कश डिजे आवडतील का..? कधीतरी याचाही विचार व्हावा. “तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसी..?” असं म्हणत स्पर्धा केली तर नुकसान आपलंच होईल. सण समारंभ प्रसंगी केवळ दिखाऊपणा न करता प्रशंसनीय आयोजन, नियोजन असावे. ज्यातून केवळ परमोच्च आनंद मिळेल… पाहणाऱ्यांना कानात बोटे न घालता डोळे विस्फारून पाहिले पाहिजे.. अन् मुखातून फक्त “वाह व्वा…” हेच शब्द उच्चारले पाहिजेत…मग उत्सव देवाचा असो की देवीचा…हिंदूचा असो वा मुस्लिम, ख्रिस्ती कुणाचाही..लोक श्रद्धेने नतमस्तक होतील..!

© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा