You are currently viewing भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित…

भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित…

भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित…

उपवनसंरक्षकांची कारवाई; बोगस पास विक्री केल्याचा ठपका…

कणकवली

सावंतवाडी, माणगाव नंतर आता कणकवली तालुक्यात बोगस पास विक्री प्रकरण उघड झाले आहे. तसा ठपका ठेवून भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केली. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यानिशी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांच्याबाबत बोगस पास विक्री यासह अनेक तक्रारी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. माहिती अधिकारात माहिती मिळवत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. सत्यवान सुतार यांनी दिलेला पास हा वाहन क्षमतेपेक्षा तिप्पट क्षमतेचा होता, तसेच संबंधित पासवर लाकूड सामान वाहतूक करणाऱ्या वाहना ऐवजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा फोटो लावला होता. हीबाब विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यानिशी उघड केली होती. सत्यवान सुतार हे यापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असताना अवैध वृक्षतोड प्रकरणी निलंबित झाले होते. सुतार यांच्या बाबत स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी होती. सुतार यांच्या अवैध व नियमबाह्य कृतीमुळे कणकवली वनविभाग चर्चेत आला होता. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूडतोड आणि पास विक्री प्रकरणाची देखील चर्चा होत होती.
दरम्यान निलंबनानंतर सुतार यांना वनक्षेत्रपाल कार्यालय दोडामार्ग येथे निलंबन कालावधीत मुख्यालय देण्यात आले आहे. तर शासकीय नियमानुसार त्यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय देणे आवश्यक असून याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले आहेत.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा