सिंधुदुर्ग
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, लोक अदालत सिंधुदुर्ग ओरोस आणि तालुका न्यायालयात सकाळी १०:३० वाजता भरवण्यात येणार आहे. या लोक अदालत मध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरण, धनादेश अनादर, बँकेची कर्ज वसुली, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक म्हालटकर यांनी दिली आहे. ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशा पक्षकारांनी सदर संवर्गातील प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क करून आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस. व्ही. हांडे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.