You are currently viewing जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत मार्गदर्शन

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत मार्गदर्शन

वेंगुर्ले :

 

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील खानोली, वायंगणी, मातोंड, पेंडुर या गावात भेट देऊन, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले.

यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रभारींशी चर्चा करून प्रचाराचे मार्गदर्शन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, खानोली निवडणूक प्रभारी वसंत तांडेल, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, जेष्ठ नेते बाळा सावंत, सोशल मीडियाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, सुधीर गावडे, कमलेश गावडे, होडावडा उपसरपंच राजबा सावंत तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे उमेदवार, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =