You are currently viewing आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी मोहिमेत प्रशासनाने धान्यदुकानदारांनाही वेठीस धरले

आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी मोहिमेत प्रशासनाने धान्यदुकानदारांनाही वेठीस धरले

*आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी मोहिमेत प्रशासनाने धान्यदुकानदारांनाही वेठीस धरले*

*धान्यदुकानदारांवरील अन्याय शासनाने दूर करावा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.*

केंद्र शासनामार्फत तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांना आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य विषय लाभ देण्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील निमशासकिय संस्था व आरोग्य यंत्रणा यांचेमार्फत युध्द पातळीवर मोहिम राबविली जात आहे. हि चांगली गोष्ट आहे पण हे काम पुर्ण होताना येणाऱ्या अडचणी पाहून चक्क धान्यदुकान दारांना वेठीस धरण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनामार्फत झालेला आहे. अगोदर सर्व्हर व नेट च्या सततच्या समस्येमुळे हैराण असलेले आणि शासनाच्या कोणत्याही कामांत सदोदित सहकार्यं करणाऱ्या धान्यदुकानदारांना त्यांचे कमिशनांत वाढ न करता कामाचा बोजा लादण्याचे धोरण म्हणजे शासनाकडून अन्याय आहे. तशा प्रतिक्रीया धान्यदुकानदारांतून व्यक्त होत आहेत. हा अन्याय शासनाने दूर करावा. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यदृष्ट्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी हि फार महत्वाची आहे. सदर योजनेचे काम येत्या ३१ ऑक्टोबर पर्यत पुर्ण करण्यासाठी शासनाने तळागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना व आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना हे काम दिलेले आहे. सदरचे काम हे सर्व्हर डाऊन, नेट न मिळणे, हाताचे ठसे किंवा डोळ्याचे बुबुळ मॅच न होणे यासह तांत्रिक बाबींचा अडथळा येत आहे. असे असताना धान्यदुकानदारांना वेठीस धरण्याचा प्रकार जिल्हा प्रशासनामार्फत झालेला आहे. प्रत्येक वेळी रास्तभाव धान्य दुकानदार शासनाने धान्य वितरण संदर्भात दिलेले काम मुकाटपणे करतात. पण आता दिलेले काम हा सरासर धान्यदुकानदारांवर अन्याय आहे. हा अन्याय जिल्हा प्रशासनाने त्वरीत दूर करावा किंवा असे काम त्यांचेकडे देताना त्याचा मोबदला त्यांना देण्यात यावा, कारण शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा