पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे आज 3 डिसेंबर 2020 रोजी वेंगुर्ला तालुक्यासाठी दिवस राखीव ठेवला होता. परंतु कोणत्याही प्रतिक्रिया प्राप्त न झाल्या कारणाने किंवा कोणतेही नियोजन न केल्या कारणाने एकही बैठक तसेच व्याख्यानाचे आयोजन केले गेले नाही. तथापि मुंबईहून 500 किलोमीटर प्रवास करुन कोकणातील विद्यार्थ्यांना अधिकारी तसेच कर्मचारी पदावर घडवण्यासाठी एक सकारात्मक भूमिका ठेवून स्वतः वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरविले. सावंतवाडी बस स्टैंड वर एका कॉलेजमधले 4-5 विद्यार्थी एकटवून त्यांना स्पर्धा परीक्षा तसेच तिमिरातुनी तेजाकडे उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांना या उपक्रमात समाविष्ट करून घेतले.
त्यानंतर वेंगुर्ल्यातील आडेली गावात सहजच एका विद्यार्थ्याला भेटण्याच्या अनुषंगाने गेलो असता तेथे अजून दोन विद्यार्थी दृष्टिक्षेपात माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलेले होते. *केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे* या तत्त्वावर त्या तीन महाविद्यालयीन युवकांनी त्यांच्या स्वगृही नेऊन दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली व अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या संपर्कातील विद्यार्थ्यांना एकटवून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराची तयारी सुरू केली. अर्ध्या तासाच्या आत माझे जेवण संपता संपता संपर्कातील 18 ते 20 युवक वर्ग माझ्या मार्गदर्शनासाठी एकटवला आणि सलग दोन तास मी त्यांना मार्गदर्शन केले.
आजचा हा प्रसंग माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी होता आणि या युवक वर्गाची मार्गदर्शनासाठी तळतळ आणि कोणतेही तयारी नसताना अर्ध्या तासाच्या कालावधीत स्वतःहून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून स्वतः त्या मार्गदर्शन शिबिराचा विद्यार्थी स्वरूपात भाग बनले. मी अत्यंत गहिवरून गेलो आहे, मार्गदर्शन करता-करता माझा गळा भरून आला, फक्त रडू येणे बाकी होते. *हाच आहे माझा कोकणातील विद्यार्थी, आणि परिवर्तन तर 100% टक्के घडणारच*
मला आशा आहे की आजच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले हे विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये अधिकारी तसेच कर्मचारी स्वरूपात स्वतःला घडवण्यासाठी योग्य ते मेहनत व प्रयत्न करणार आहेत.
🙏 सत्यवान रेडकर
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार