You are currently viewing मोदींचा मालवण दौरा विकासासाठी की स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी..? – अमित इब्रामपूरकर

मोदींचा मालवण दौरा विकासासाठी की स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी..? – अमित इब्रामपूरकर

मोदींचा मालवण दौरा विकासासाठी की स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी..? – अमित इब्रामपूरकर

मालवण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नौदल दिनानिमित्ताने मालवण मध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने शहरात दांडी, गवंडीवाडा, बाजारपेठ या ठिकाणच्या ६८ अनधिकृत बांधकामांना स्वखर्चाने तोडून टाकण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासनाला कारवाईसाठी मालवणच लागते का ? असा प्रश्न मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी पत्रकातून उपस्थित केला आहे.

दरम्यान मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी आज घेतलेल्या भूमिकेला मनसेचा सक्रिय पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शहरावर जाणीवपूर्वक शासन अन्याय करत असल्याचे स्पष्ट होत आहे. जलक्रीडा व्यवसायावर सुद्धा शासनाने कारवाई केली होती. कोकण किनारपट्टीवर रायगड ते सिंधुदुर्ग पर्यंत किनारपट्टी भागात ९० टक्के अनधिकृत बांधकामे आहेत. परंतु ती बांधकामे तोडण्याचे धाडस शासनाकडे नाही. महसूल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांधकामे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नसून शासनाच्या नियमांच्या उल्लंघनाचा भाग आहे. जर असे असेल तर शासनाला संपूर्ण कोकणपट्टीवर मालवण शहरातच कारवाई करावीशी का वाटते?

शहरातील भाजपचा एक गट बंदर जेटी वरील पार्किंगचा टेंडर साठी सक्रिय असल्याची माहिती आमच्याकडे असून मुंबईत होणार्‍या बैठकांची माहितीही आहे. बंदर जेटीच्या आसपासच्या भागाची यासाठीच साफसफाई करण्यात येत आहे का असाही प्रश्न निर्माण होत आहे असे त्यांनी म्हटले आहे. ६८ अनधिकृत बांधकामांच्या यादीत दांडी येथील ५०, गवंडीवाडा येथील १० तर बाजारपेठेतील ८ बांधकामांचा समावेश आहे. विरोधी पक्षातील लोकांचाही या यादीत समावेश असून सत्ताधारी पक्षातील लोकांच्या अनधिकृत बांधकामांना जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसत आहे. म्हणजेच शहरातील लोकांची रोजीरोटी हिसकावून घेण्याबरोबर विरोधी पक्षातील लोकांची अनधिकृत बांधकामे पाडण्याचे शासनाने आणि सत्ताधार्‍यांनी ठरवल्याचे दिसत आहे. मागील महिन्यात केंद्र शासनाने सीआरझेड कायद्यामध्ये बदल करून ३०० चौरस मीटर पर्यंतच्या बांधकामांना स्थानिक प्राधिकरण म्हणजेच मालवण नगरपरिषद परवानगी देवू शकणार आहे. त्यासाठी मुंबईतून पर्यावरण खात्याचा नाहरकत दाखला आणण्याची आवश्यकता नसल्याची दुरूस्ती केली. ही दुरूस्ती धन दांडग्यांसाठी होती की स्थानिक नागरिकांना बेरोजगार करण्यासाठी होती. ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील तरुणांनी बँकांची कर्ज काढून आपली रोजीरोटी सुरू केली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असून सुरुवातीलाच त्यांनी सुरू केलेले व्यवसाय आणि त्यासाठी केलेली बांधकामे पाडण्याचे सांगितले जात असेल तर मोदींचा दौरा विकासासाठी की स्थानिकांना विस्थापित करण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा