मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि साप्ताहिक मराठी जगत यांच्या संयुक्त विद्यमाने नवोदित पत्रकार बनू इच्छिणार्यांसाठी पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ वर्षांवरील किमान १० वी पास असलेल्या इच्छुकांना या कार्यशाळेत प्रवेश घेता येईल.
पत्रकार म्हणजे काय ? पत्रकारांची नितीमूल्ये, कर्तव्ये व व्यक्तीमत्व, फोटोग्राफी व बातमी, लेख कसा लिहावा, सामाजिक, राजकिय व सांस्कृतिक पत्रकारीता, प्रिंट मिडीया, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीया अशा विविध विषयानुसार प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेत पत्रकारीता क्षेत्रातील विविध मान्यवर प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वर्तमानपत्रात काम करण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक रविवारी ही कार्यशाळा मुंबईमध्ये चालणार आहे.
इच्छुकांनी संयोजक सूरज भोईर ९९६९६ ८६०१४, दिपक कलींगण संयोजक ८०९७६५३५९०, गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ आणि समन्वयक संदीप पाटील ८८५०४७००१६ यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.