कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी :-
◆कुडाळ तालुक्यातील मौजे पांग्रड काजीमाचे टेंब येथे कंटेन्मेंट झोन :- कुडाळ तालुक्यातील मौजे पांग्रड काजीमाचे टेंब मध्ये 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत.
◆कुडाळ तालुक्यातील मौजे ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे कंटेन्मेंट झोन
कुडाळ तालुक्यातील मौजे ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील देव अपार्टमेंट बी-विंग पहिला मजला परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत.
◆कुडाळ तालुक्यातील मौजे कुडाळ येथील कामत चाळ, नक्षत्र टॉवर, कुडाळेश्वरवाडी व वरची कुंभारवाडी येथे कंटेन्मेंट झोन :- कुडाळ तालुक्यातील मौजे कुडाळ येथील कामत चाळ रेणुका स्वीटच्या मागे, नक्षत्र टॉवर घर नं. 398415, कुडाळेश्वरवाडी गिरनार हिल इमारत ए-विंग, वरची कुंभारवाडी घर क्र. 3797 मधील परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये अनुक्रमे दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत.
तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम,1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.