You are currently viewing मसुरेत २४ ते २६ ऑक्टोबरला साई पुण्यतिथी महोत्सव…

मसुरेत २४ ते २६ ऑक्टोबरला साई पुण्यतिथी महोत्सव…

मसुरेत २४ ते २६ ऑक्टोबरला साई पुण्यतिथी महोत्सव…

मालवण

येथील साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने गडघेरा बाजारपेठ येथील साई मंदिर येथे २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान साई पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२४ ऑक्टोबरला सकाळी ५ वाजता काकड आरती व साईंची विधिवत पूजाअर्चा. सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा. पूजा मानकरी प्रसाद बागवे उभयता. दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद. संध्याकाळी ७ वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि आरती, प्रसाद वाटप. संध्याकाळी ८ वाजता दत्तप्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे सुश्राव्य भजन. रात्री ९ वाजता भरतगड प्रसादिक भजन मंडळ गडघेरा यांचे भजन.
२५ ऑक्टोंबरला सकाळी ६ वाजता विधिवत साईंची पूजाअर्चा. दुपारी १२ वाजता महाआरती. संध्याकाळी ७ वाजता मंदिर सभोवती श्री साई पालखी मिरवणूक आणि महाआरती. रात्री ८ वाजता बजरंग बली प्रसादिक भजन मंडळ मसुरे कावावाडी यांचे सुश्राव्य भजन. रात्री ९ वाजता स्थानिक विविध भजने आणि मसुरे गावामध्ये श्री साईंचा झुणका भाकर प्रसाद वाटप कार्यक्रम.
२६ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता साईंची विधिवत पूजाअर्चा. दुपारी १२ वाजता श्री साई भंडारा, रात्री ८ वाजता टोकळवाडी प्रसादिक भजन मंडळ बुवा संतोष मसुरकर यांचे सुश्राव्य भजन. रात्री ९ वाजता ट्वेंटी-ट्वेंटी डबल भजन बारी.
स्वयंभू प्रसादिक भजन मंडळ पियाळी बुवा श्री संतोष कानडे, मृदुंग योगेश सामंत, तबला विकास देवळे विरुद्ध डुंगो कमाला प्रसादिक भजन शेलपि, बुवा श्री दिनेश वागदेकर, मृदुंगमणी सचिन राणे, तबला अजित मार्गी या भजनीबुवांमध्ये होणार आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन साईकृपा मित्र मंडळ मसुरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा