*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रंग मोरपंखी*
मयूर नर्तन करी
फुलवी भव्य पिसारा
राजवर्खी पंखांचा
दिसतो दिव्य नजारा
पाही मोरपिशी स्वप्नं
अर्धोन्मिलित नयनी
सत्यात उतरता अवघी
सुखावते कुणी रमणी
नववधुचा हट्ट लाडीक
मोरपंखीच शालू हवा
रंगासम त्या फुलवीन
संसार नवलाईचा नवा
कृष्णमुकुटावरी विराजे
मयूर पंख दिमाखात
त्याच्याविना अधुरे राही
किरीट हिरेमाणके जडित
मोरपंखासम दिसणाऱ्या
विद्येचे झाड, असे नाम
वह्या पुस्तकात ठेवता
वाढे बुद्धी, विश्वास ठाम
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा