You are currently viewing महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली मा.शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांची भेट

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली मा.शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांची भेट

आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग पदाधिकारी यांनी मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन खालील विषयासंदर्भात चर्चा केली.

कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी अधिगृहित करण्यात आलेले होते. दरम्यानच्या काळात विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांकडून विजेचा वापर झाला. त्यामुळे शालेय विजबिलामध्ये भरमसाठ वाढ झाली. सदर वीज बिल शालेय प्राप्त अनुदानातून भरणे शक्य नसल्याने त्याकाळातील अतिरिक्त वीजबिल आपलेस्तरावरून भरण्याची सोय व्हावी किंवा त्या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणेबाबत विनंती केली असता पटसंख्येनुसार कमीतकमी ४००० ₹ ते १५००० ₹ पर्यंतची रक्कम लवकरच शाळांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील जिल्हा परिषद शाळांचे वार्षिक नियोजन सर्व जिल्हा परिषद शाळांना प्राप्त व्हावे. जेणेकरून कोरोना शिक्षकांना सुट्ट्यांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होईल या संदर्भात मार्गदर्शनपर पत्र काढण्यात येईल.

वार्षिक कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन करणे सद्यस्थितीमध्ये अडचणीचे असले तरीही ज्ञानी मी होणार स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात चर्चा केली असता ऑनलाइन स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याबाबत नियोजन करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गमार्फत मित्र उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी विपश्यना ध्यान व संस्कार ऑनलाइन वर्गाच्या तालुकावर आयोजनासाठी परवानगी देण्यात आली.

या सर्व विषयांवर मा. शिक्षणाधिकारी यांची संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री गणेश भिकाजी नाईक, कार्यवाह सुनिल परशुराम करडे व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा