You are currently viewing शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कविसंमेलन आणि नारायणी ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कविसंमेलन आणि नारायणी ई-बुक प्रकाशन सोहळा संपन्न

बदलापूर (गुरुदत्त वाकदेकर) :

 

‘ॐकार मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव बदलापूर (पूर्व)’, ‘राष्ट्रकुट युट्युब वाहिनी’ आणि ‘मराठी साहित्य व कला सेवा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलन बदलापूर येथे संपन्न झाले. त्याप्रसंगी व्यासपीठावर बदलापूरचे कार्यसम्राट मा. नगरसेवक प्रकाश भाऊ मरगज, राष्ट्रकुट युट्यूब वाहिनीचे संपादक प्रकाश ओहळे, ॐकार मित्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद दळवी, सचिव महेंद्र चोंदे, कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी सन्माननीय जयंत भावे, तसेच मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक गुरूदत्त वाकदेकर उपस्थित होते. संमेलनाच्या सुरूवातीलाच सर्व मान्यवरांचा सन्मान शाल आणि शब्दगुच्छ अर्थात पुस्तक देऊन करण्यात आला.

 

शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलनाला बदलापूरचे कार्यसम्राट मा. नगरसेवक प्रकाश भाऊ मरगज यांनी खूप मनापासून शुभेच्छा दिल्या. तर समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष मान्यवर ज्येष्ठ कवी जयंत नारायण भावे यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनाची सांगता त्याच्याच रचनेने झाली.

 

शारदीय नवरात्रौत्सव कविसंमेलनात ठाणे जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर कवी जयेश शशिकांत मोरे, संजय विष्णु जाधव, राजेश साबळे, ओतूरकर, श्रीशैल नंदकुमार सुतार, रमेश मारुती पाटील, रोहिणी श्रीकांत कोठावदे, प्रा. वैभवी माने-अय्यर, पद्माकर केशव भावे, माधुरी मधुकर फालक, प्रिया प्रवीण मयेकर, रमेश तारमळे, सुभाष शांताराम जैन, ज्योती गोळे, वंदना अशोक कापसे, मोहिनी लिमये, सविता नारायण खाळे यांच्या दमदार कवितांनी कविसंमेलन दिमाखात संपन्न झाले.

 

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. त्यांनी सर्व कवींचा सुंदर असा परिचय करून दिल्याने कार्यक्रमात अधिक उत्साह जाणवला.

 

संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींच्या कवितांचा सुंदर असा “नारायणी ई-काव्यसंग्रह” मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित करण्यात आला. सर्व सारस्वतांचा सुंदर सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सादर झालेल्या सर्व कवीच्या कवितांचे एकत्रीकरण करून त्याचे प्रसारण ‘राष्ट्रकुट युट्युब’ वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. त्यासाठी संपादक प्रकाश ओहळे आणि छायाचित्रणकार अनिल पानस्कर यांचे मोलाचे योगदान लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा