You are currently viewing जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत शहीद पोलिस स्मृती दिन संपन्न

जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत शहीद पोलिस स्मृती दिन संपन्न

सिंधुदुर्गनगरी:

 

आज ओरोस जिल्हा पोलिस परेड मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या उपस्थितीत शहीद पोलिस स्मृती दिन संपन्न झाला.

२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लड़ाख़ मधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा ‘हॉटस्प्रिंग’ या ठिकाणी भारताचे १० पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या वीर पोलिस जवानांनी भारतीय सीमेचे रक्षण करताना दाखविलेल्या त्या अलौकीक शौर्याची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्र निष्ठेची व कर्तव्य निष्ठेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीपित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारत भर ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून वर्षभरात १ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झाली, त्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे परेड मैदानावर पोलीस स्मृती दिन साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करत स्मृती वंदना दिली.

पोलीस स्मृती दिन परेड श्री. किशोर तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राखीव पोलीस निरीक्षक श्री. रामदास पालशेतकर यांचे नेतृत्वाखाली असलेल्या प्लाटूनने शोक सलामीव्दारे मानवंदना दिली. यावेळी दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झाली अशा बोरांचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या संबंधीत प्लाटूनने हवेत ३ वेळा गोळीबार करून मानवंदना दिली. शहीद जवानांना मानवंदना दिल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. किशोर तायडे व पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी शहीद पोलीस स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहीली. पोलीस स्मृती दिन परेडकरीता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच मुख्यालयाचे बँड पथक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा