सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीतील व देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचा विद्यार्थी प्रथमेश गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोशियनचा जलद गती गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हा पहिलाच खेळाडू महाराष्ट्र संघात निवड होत आहे. १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात त्याने आपला परफॉर्मन्स दाखवला होता. त्यामुळे त्याची आता २३ वर्षे संघात निवड झाली आहे. सावंतवाडी सारख्या दुर्गम भागात त्याने लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले त्याचे बालपण व कॉलेजचे शिक्षण सावंतवाडीत झाले आहे. सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर त्याने सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बॅनर खाली प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षक दिनेश कुबडे आधी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गोलंदाजी फलंदाजी व क्षेत्ररक्षणाचे धडे गिरवले आहेत.
जलद गती गोलंदाज म्हणून त्याने लहान वयातच आपली ओळख निर्माण केली होती. सुंदर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या चौदा वर्षाखालील व सोळा वर्षाखालील संघातहि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची अनेक जिल्हास्तरीय व जिल्हा व्हायरल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याने आपली कामगिरी बजावली होती. आपल्या शैलीदार उत्कृष्ट गोलंदाजी मुळे त्याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील वयोगटात आंबोली येथील प्रथमेश गावडे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचे वडील माजी सैनिक असून मामा माजी सैनिक व आंबोली सैनिक स्कूलचे कर्मचारी रुपेश आईर यांनी त्याला क्रिकेटचे धडे दिले आहेत. त्याच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
१८ व २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघात प्रथमेश गावडे याची निवड झाल्यानंतर आता त्याची पुढील वाटचाल रणजी स्पर्धेसाठी आहे. २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात एकूण सोळा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात त्याचा समावेश आहे महाराष्ट्र रणजी स्पर्धेसाठी त्याचीही निवड महत्त्वाची मानली जात आहे.