तब्बल १० के. व्ही क्षमतेची होणार वीज निर्मिती;नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती
कुडाळ :
शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गतच्या प्रकल्पातुन १० के. व्ही. क्षमतेची विज निर्मिती होणार असून, या प्रकल्पामुळे विजेची बचत होणार असून, ही कामे पूर्णत्वास आल्याने कुडाळच्या विकासात भर पडणार असल्याचे प्रतिपादन कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत कुडाळ नगर पंचायतच्या इमारतीवर १० किलोवॅट क्षमतेच्या सौर विद्युत संच बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करतेवेळी केले आहे. शासनाच्या वतीने विज बचती करीता व उर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. शासनाच्या अपारंपारीक उर्जा विकास योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या इमारतीवर सौर विद्युत संच बसविणे या कामाची निवड करण्यात आलेली होती. या कामास जिल्हा वार्षिक योजनेतून १० किलो वॅट क्षमतेचा सौर विद्युत संच मंजुर करण्यात व नगरपंचायतीच्या इमारतीवर बसवून काम पूर्ण करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाला ६ लाख ४० खर्च आला आहे. कुडाळ नगर पंचायतीच्या इमारतीवर शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत १० किलोवॅट क्षमतेच्या सौर विद्युत संच बसवण्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते झाला. यावेळी उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, नगरसेवक विनायक राणे, सुनील बांदेकर, संध्या तेरसे, उषा आठल्ये, अश्विनी गावडे, सरोज जाधव, बाळा वेंगुर्लेकर, तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेल परब, विशाल होडावडेकर, संदीप कोरगावकर व कर्मचारी उपस्थित होते.