You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्झरी ड्रायव्हरने येणाऱ्या विविध समस्यांबाबत परशुराम उपरकर यांची घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्झरी ड्रायव्हरने येणाऱ्या विविध समस्यांबाबत परशुराम उपरकर यांची घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्झरी ड्रायव्हरने येणाऱ्या विविध समस्यांबाबत परशुराम उपरकर यांची घेतली भेट

स्थानिक ड्रायव्हर यांच्या पाठीशी खंबीर असल्याची परशुराम उपरकर यांनी दिली ग्वाही

सावंतवाडी

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्झरी ड्रायव्हर यांनी सावंतवाडीत मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची भेट घेत त्यांना गाडी मालकांकडून होणाऱ्या विविध समस्या व अडचणींबद्दल माजी आमदार श्री उपरकर यांच्याशी चर्चा केली लक्झरी मालकांकडून परप्रांतीयांना दिलेला अभय व जिल्ह्यातील स्थानिक ड्राइवर यांना वगळून अल्प दरात लायसन्स नसलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीय लोकांना ड्रायव्हर म्हणून ठेवत जिल्ह्यातील स्थानिक ड्रायव्हर यांच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार उपस्थितांनी श्री उपरकर यांच्याकडे केली लक्झरी मालकांकडून होत असलेली दोन नंबर वाहतूक त्यामुळे आरटीओ एक्साईज कडून जिल्ह्यातील ड्रायव्हर यांना होत असलेला नाहक त्रास व लगेचचा माध्यमातून चुकीच्या पद्धतीने होणारी वाहतूक ह्या सर्व गोष्टींना स्थानिक ड्रायव्हर यांनी विरोध केला असल्याने लक्झरीमालक परप्रांतीय ड्रायव्हर यांना अभय देतायेत कारण त्यामुळे अल्प दरात परप्रांतीय काम करत आहेत व चुकीच्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने लक्झरी मालकांचा फायदा होत आहे असे काही पुरावे आज उपस्थित जिल्ह्यातील स्थानिक ड्रायव्हर यांच्याकडून सादर करण्यात आले तर मनसे पूर्णपणे जिल्ह्यातील स्थानिक ड्रायव्हर यांच्या पाठीशी खंबीर असल्याची ग्वाही श्री उपरकर यांना दिली . तसेच संघटित होण्यासाठी संस्था निर्माण करण्याचा सल्ला श्री उपरकर यांनी दिला यानुसार लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा ड्रायव्हर युनियन स्थापन करण्यात येणार आहे याबाबत श्री उपरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यापुढे आमच्या स्थानिक ड्रायव्हर यांचा वर लक्झरी मालक आरटीओ एक्साईज यांच्याकडून विनाकारण अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरू वेळप्रसंगी आंदोलन छेडून आमच्या स्थानिकांना न्याय देऊ असा इशारा माजी आमदार उपरकर यांनी दिला मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून आज सदर बैठक लावण्यात व ड्रायव्हर यांना होणाऱ्या समस्यांबाबत तोडगा काढण्यात आला ह्यावेळी. माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक ड्रायव्हर संघटनेचे विजय जांभळे जिल्हा सचिव श्री निलेश देसाई विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष स्वप्निल जाधव व आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ड्रायव्हर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा