महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदारावर वचक ठेवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी – परशूराम उपरकर
निकृष्ट कामामुळेच चिपळूण येथील पुल कोसळला..
कणकवली
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदारावर वचक ठेवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असून निकृष्ट कामामुळेच चिपळूण येथील बहादूर शेख नाका पुल कोसळला. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न सोडविणे ऐवजी अडचण निर्माण करण्याचे काम केले आहे.असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर बोलत होते.ते म्हणाले, चिपळूण येथील बहादूर शेख नाका पूल काल कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हे जनतेचे सुदैव म्हणावे लागेल. जे मंत्री डिसेंबर पर्यंत वाहतूक पूर्णपणे सुरू करणार असे सांगत होते त्याचे काय झाले? असा सवाल करताना उपरकर म्हणाले, सत्ताधारी आम. नितेश राणे यांनी डिसेंबर पर्यंत कोणत्या स्थितीत वाहतूक सुरु होईल असे वक्तव्य केले होते. तत्पूर्वी काम सुरू असताना ब्रिज कोसळल्याने नॅशनल हायवे कशाप्रकारे काम करते हे दिसून आले आहे असे सांगताना ते म्हणाले, खास. विनायक राऊत यांनी हायवेचे ऑडिट करणार असे सांगितले होते मात्र आतापर्यंत कणकवलीतील उड्डाणपुलाच्या ऑडिटचे काय झाले? हे समजू शकले नाही. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे नव्हे तर अडचण निर्माण करण्याचे काम करत आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले प्रश्न काय सोडविणार हे आता जनतेने पाहिले आहे. कणकवलीतील पूल ढासळले त्याचे ऑडिट करणार असे सांगत दिशाभूल करण्याचे काम लोकप्रतिनिधीनी केले आहे .गडनदी आणि जाणवली येथील पूलाचे काम होण्यापूर्वी सदरचे स्टील सडत असल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र मनसेने वारंवार यावर आवाज उठवूनही सिमेंटच्या गिलावा काढून असे काही झाले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न प्राधिकरणने केला असे सांगताना ते म्हणाले, हायवे कामावर वचक ठेवणे गरजेचे होते मात्र काही लोकप्रतिनिधी गाड्या घेऊन तर काहींनी सभेला पैसे घेऊन गप्प राहण्याची भूमिका घेतली असे आता जनताच म्हणत आहे .असे उपरकर म्हणाले.
पत्रादेवी ते कलमठ इथपर्यंतच्या रस्त्याच्या ठेकेदाराने शौचालय न बांधता निघून जाण्याचे काम केले आहे. त्यामुळे आज महिला वर्गाची मोठी कुटुंबना होत आहे. हायवेला विलंब लागण्यास निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. ठेकेदारावर वचक ठेवण्यात ते अपयशी ठरले. आपली दक्षिणा मिळाल्यावर गप्प राहण्याची भूमिका त्यांनी घेतली . मनसेने आवाज उठवल्यानंतर ॲम्बुलन्स व हेल्पलाइन सुरू झाली असे सांगताना ते म्हणाले,पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकेरी वाहतूक रस्ता सुरू करणार असे सांगितले होते मात्र गणपती सण संपला तरी पालकमंत्री आहेत कुठे आहेत सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*