You are currently viewing निलेश राणे, दत्ता सामंत यांनी आचऱ्यातील विकास कामांसाठी निधी न दिल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला – मंगेश टेमकर

निलेश राणे, दत्ता सामंत यांनी आचऱ्यातील विकास कामांसाठी निधी न दिल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला – मंगेश टेमकर

*निलेश राणे, दत्ता सामंत यांनी आचऱ्यातील विकास कामांसाठी निधी न दिल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला – मंगेश टेमकर*

*भाजपचे आचरा गावचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर व माजी सरपंच प्रणया टेमकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश*

*आ. वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात केले स्वागत*

आचरा ग्रामपंचायतीवर भाजप पक्षाची सत्ता असताना माजी खासदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्याकडे आचरा येथील अनेक विकास कामांची मागणी सरपंच प्रणया टेमकर व आम्ही केली होती.मात्र त्यातील एकही विकासकाम त्यांनी केले नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडूनही एकही रुपयाचा निधी आचरा गावासाठी आलेला नाही. याउलट जाणीवपूर्वक आपणास डावलले जात होते. आचरा ग्रा.प च्या मागील निवडणूकीवेळी नीलेश राणे आणि दत्ता सामंत यांनी वारेमाप आश्वासने दिली होती मात्र निवडणुकीनंतर त्याकडे पाठ फिरविण्याचा वाईट अनुभव या दोघांकडून मला आला आहे.मात्र आमदार वैभव नाईक हे त्यावेळी विरोधक असूनही आम्ही मागणी केलेली विकास कामे ते मार्गी लावत होते. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून समुद्र किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारे, कणकवली ते आचरा रस्ता, आचरा ते मालवण रस्ता,आचरा येथे विद्युत सबस्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका अशी अनेक महत्वाची विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. म्हणूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे आचरा गावचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी सांगितले.तसेच आ. वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आचरावासीय निवडणूकित शिवसेनेच्या पाठीशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मालवण तालुक्यातील आचरा गावचे भाजप पक्षाचे माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, माजी सरपंच प्रणया टेमकर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.यावेळी मंगेश टेमकर यांना होऊ घातलेल्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सरपंच पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.आ. वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नितीन वाळके,युवासेना समन्वयक मंदार ओरसकर,शहर प्रमुख बाबी जोगी,अमित भोगले, तालुका प्रमुख दिपा शिंदे, युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, विभागप्रमुख समीर लब्दे, अनिल गावकर,अन्वय प्रभू, पिंट्या गावकर,शंकर मिराशी, उदय दुखंडे, नारायण कुबल, विनायक परब,समीर हडकर, अरुण लाड,श्याम घाडी,अनुष्का गावकर,पप्पू परुळेकर, भाई कासवकर, आबा सावंत,नितीन घाडी ,राजू नार्वेकर,भाऊ परब,भाऊ चव्हाण,पूजा तोंडवळकर,नबीला नाईक,युगंधरा मोर्जे,श्रद्धा सक्रु,अनिकेत मांजरेकर, सुंदर आचरेकर,वैभव कुमठेकर,शेखर मुणगेकर,पूर्वा तारी,सुकन्या वाडेकर,आयवान फर्नांडिस,चंदन पांगे,दिलीप कावले, सिद्धेश मांजरेकर, राहुल सावंत यांसह शिवसेना, युवासेना, महिलाआघाडी व युवतीसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा