प्रिय विराज भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
आठवणी असतात कायम
मनात साठवून ठेवायच्या..
सुखात त्या डोळ्यात आणायच्या,
दुःखात पापण्या आड लपवायच्या…
वाहू द्यायच्या नाहीत,
अश्रूंच्या वाहणाऱ्या पुरात.
त्यांचीही खास जागा असते,
हृदयाच्या आतल्या कप्प्यात..
नाव तुझे असते ओठी,
सुखाच्या प्रत्येक क्षणास.
दिवस जरी सरले तरी,
यातना होतात अजुनी मनास..
दिसत असेल तुला आजही,
मोकळी असलेली तुझी जागा,
तुझ्यासारखा मोती विणण्या,
बनला नाही दुसरा रेशीम धागा..!!