आपल्या सार्वजनिक जीवनात अशा काही घटना घडलेल्या असतात की त्या विसरणे शक्य नाही. अशीच एक घटना की जी शेअर करण्यात एक वेगळाचं आनंद आणि समाधान आहे.
२०१५ चा तो जून महिना, मला सकाळीच देवगड,बापार्डे येथून फोन आला,”हँलो,नकुल पार्सेकर का..?मी डॉ. सुरेश नाईकधुरे बोलतोय.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे यांचा भाऊ,आपल्याकडे माझ्या मुलीच्या प्रवेशा संदर्भात काम आहे.भेटायला यायचं आहे..इ.इ..यावर मी म्हणालो साहेब,मेडिकल प्रवेशाचे काम..माझ्याकडून कसं होईल..मी ना कुणी आमदार, नामदार ना पक्षाचा नेता..तरीही ते मला भेटण्याबाबत फारच आग्रही होती.मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला,”साहेब,माझा संदर्भ कुणी दिला? ते म्हणाले ,श्री प्रमोद जठार.. खरं तर विठ्ठलराव नाईकधुरे या़चा संदर्भ म्हणजे एका अतिशय प्रामाणिक, निष्ठावंत आणि विशेष म्हणजे स्व आपासाहेब गोगटे यांचे संस्कार असलेले जुन्या भाजपाचे अतिशय नम्र आणि पारदर्शी कार्यकर्ते. जि.प.चे उपाध्यक्ष असताना ते दोनवेळा माझ्या घरी येवून गेले.त्यांच्या जि.प.मतदार संघात मी दोन दिवस प्रचारासाठी पण होतो.अशा कार्यकर्त्यांची पुतणी अदिती हीला मदत करणे हे माझं कर्तव्यचं होत.
जून महिन्यात धो धो पावसात अदिती आणि तीचे वडील सायंकाळी चार वाजता माझ्या घरी पोचले.अदितीला डॉक्टर व्हायच आहे.मार्कस् कमी आहेत…पण डाँक्टर होण्याच तीचं स्वप्नं पूर्ण नाही झालं तर मला पुढे काहीच करायचं नाही.. वगैरे.. वगैरै.. मी जेव्हा तिच्याशी बोललो तेव्हा ती फारच टेन्शनमध्ये असल्याचं पावलोपावली जाणवत होत..मला डॉक्टरचं व्हायचं आहे..या तिच्या भूमिकेवर ती ठाम होती.वडीलांनी मुंबईतील काही मोठ्या नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या.. पण नेहमीचाच अनुभव..तो अनुभव घेऊन ते माघारी फिरले.
सायंकाळी पाच वाजता मी माझे मित्र आणि भाईसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री विकासभाई सावंत याना फोन करून आरपीडी शाळेत भेट घेतली.खरं तर ही भेट फक्त अदितीच्या समाधानासाठी होती कारण तिचे गुण पहाता आणि प्रवेशप्रक्रिया ही केंद्रीय स्तरावर असल्याने भाई जे सांगणार होते याची मला कल्पना होती..पण विकासभाईनी सर्व माहिती घेऊन विषय समजावून सांगितला.ही चर्चा सुरु असताना अदितीचा सगळा नुरचं पलटला..तिच्या चेहऱ्यावर हे स्पष्टपणे जाणवत होते..चहा प्यावा म्हणून आम्ही तिघे कावेरीत गेलो.अदितीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू मी पाहिले…आणि सहज मी तिला म्हणालो,अदिती तुला होमिओपॅथी डाँक्टर व्हायला आवडेल का? ती पटकन म्हणाली,हो काका..आवडेल पण मला प्रवेश मिळेल का?..बघू..करु प्रयत्न.. मी तिच्यासमोरचं वेंगुर्ला होमिओपॅथी काँलेजचे प्राचार्य मा.केळकर सराना फोन लावला.सामाजिक चळवळीत असल्याने त्या काँलेजचा बहुतेक प्राध्यापक वर्ग परिचयाचा.सराना हा सगळा किस्सा कथन केला..सर म्हणाले,पार्सेकर, साँरी प्रवेशप्रक्रिया पार पडलीय..तुम्हाला काय सांगाव याचाच विचार पडलाय…पण याबाबत मी तुम्हाला दोन दिवसात सांगतो.मी अदितीची समजूत काढली…आपण प्रयत्न करू.यश निश्चित मिळेल..आणि तू डॉक्टर होशील.. मात्र डाँक्टर झाल्यावर मला उपचार मोफत दिला पाहिजे… तीचा मुड थोडा रिलॅक्स करण्याचा माझा प्रयत्न होता. माझा निरोप घेऊन भर पावसात ही दोघं बापलेकं देवगडच्या दिशेने निघाले.
दोन दिवसांनी केळकर सरांचा फोन आला ते म्हणाले एक पर्याय निघतोय.पण अधांतरी आहे.तरीही त्यांना भेटायला बोलवा.मी तातडीने अदितीच्या बाबाना निरोप दिला.मी म्हणालो, तुम्ही डायरेक्ट जावून भेटा..केळकर सर सहकार्य करतील.पण त्यांचा आणि अदितीचा आग्रह, काका,तुम्ही बरोबर या. ठरल्याप्रमाणे मी माझी सुमो गाडी घेऊन काँलेजला पोहचलो.सरांबरोबर सविता चर्चा झाली,त्यांनी खूप सहकार्य केल.आणि केळकर सरानी एक पर्याय समोर ठेवला.सर्व जागा भरलेल्या आहेत पण बीडचा एक विद्यार्थी मराठवाड्यातील काँलेजसाठी प्रयत्न करतोय.त्याला जर तिकडे प्रवेश.मिळाला तर ही जागा रिक्त होईल…हे ऐकून मला व्यक्तीशःखूपच आनंद झाला..कारण या सगळ्या प्रसंगात अदितीची होणारी घालमेल मी पहात होतो..यासाठी संप्टेबरं पर्यंत थांबावं लागेल..सेकंड राऊंडसाठी..
आम्ही विघ्नहर्त्या गणरायाला प्रार्थना केली की त्या बीडच्या मुलाचं काम होवू द्या… आणि गणराया पावला .आँगस्टच्या शेवटच्या आठवड्यात केळकर सरांचा मला फोन की ,तुम्ही त्या मुलीला निरोप द्या. रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या म्हणून..अतिशय आनंदाची बातमी..आम्ही जेव्हा प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा अदितीचा खुललेला चेहरा मला पाच वर्षानंतर आजही आठवतो.एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी केलेल्या छोट्याशा प्रयत्नाना यश आल्याचा आनंद होताचं पण त्यापेक्षा मला आता अँडमिशन मिळणार नाही आणि मी कधीच डॉक्टरही होणार नाही या भावनेने निराशेच्या गर्दीत हरवलेल्या अदितीला त्या गर्दीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नामधला मी एक बिंदू होतो.
सार्थक झालं.काल अदितीचा मेसेज आला..”पार्सेकर काका,मी डॉक्टर झाले…
डॉकँटर अदिती,.. बाळा अभिनंदन तुझं,तुझ्या आईबाबांच आणि Special thanks to Principal Kelkar Sir..
…अँड.नकुल पार्सेकर…