You are currently viewing मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई वाढदिवस अभिष्टचिंतन

मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई वाढदिवस अभिष्टचिंतन

जेष्ठ पत्रकार तथा तरुण भारतचे सावंतवाडी तालुका प्रतिनिधी विजय देसाई यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींच्यावतीने  गुरुवारी साजरा करण्यात आला.

यावेळी प्रविण ठाकरे, उदय नाईक, गावस, राजाराम धुरी, अनिल सरमलकर,  प्रविण परब आदी उपस्थित होते. देसाई गेली ३० वर्ष  पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात दैनिक सकाळ मधून केली होतीी. दोडामार्ग तालुक्यातील तळकट येथून त्यांनी पत्रकारिता सुरुवात केली. त्यानंतर ते गेली वीस वर्षे तरुण भारत मध्ये सावंतवाडी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यांना जिल्हा तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकार  पुरस्कार मिळालेला आहे. तत्कालीन बालविकास मंत्री पंकजा मुंडे  यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा