– भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत
कणकवली :
माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे कोणतेही पद नसलेल्या सतीश सावंत यांना बँकेतील बोगस भरती आणि बँकेचे कर्ज गैरप्रकारे वाटप केल्या प्रकरणी खुर्ची खाली करण्याचे आदेश द्यावेत. तसेच सहकार मंत्र्यांकडे बँकेची खाते निहाय चौकशीची मागणी करून संचालक मंडळ बरखास्त करावे आणि नंतरच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करावी अशी टीका भाजपा प्रदेश सदस्य सुरेश सावंत यांनी केली आहे.
दीपक केसरकर हे कर्तबगार गृहमंत्री होते हे तेव्हाच जनता मान्य करेल. पालकमंत्री असताना मीच जिल्ह्याचा विकास केला असे केसरकर म्हणत होते. मग तुमच्या सोबत पंगतीत बसत असलेल्या जिल्हा बँकेचे प्रभारी अध्यक्ष सतीश सावंत आणि संचालक मंडळाला त्वरित राजीनामा द्यायला भाग पाडावे नाहीतर दीपक केसरकर यांनी सतीश सावंत यांच्यावर केलेली टीका म्हणजे बोलाची कढि व बोलाचा भात असे समजले जाईल आणि यामुळे तुम्हीच जनतेसमोर तोंडावर आपटणार आहात असा टोला सावंत यांनी लगावला. गेले ९ महीने जिल्ह्यात नसताना फक्त टीका करण्याचे काम केसरकर करतात. अशी टीका सावंत यांनी केली आहे.