You are currently viewing हास्य कविता

हास्य कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हास्य कविता* 

 

*तिचं नेहमीच असं असायचं*

 

तिचं नेहमी असच असायचं

माझ्या सोबत रहायचं

अन् कौतुक दुसऱ्याचं करायचं

 

सकाळ संध्याकाळ

अहो…अहो…करायचं

रातच्या जेवणाला

गाऱ्हाणं गायचं

 

गपगुमान जेवताना

गाऱ्हाणं तिचं ऐकायचं

न ऐकून असं कसं भागायचं

 

प्रत्येक वेळी आईला मध्ये आणायचं

तिच्या आई शिवाय तिचं

पानच नाही ढळायचं

 

शेवटी तिने असं म्हणलं की

माझं नशिबच फुटलं

माझ्या आई बापानं

येडं ध्यान माझ्या गळ्यात बांधलं

तसं हात धुऊन ताटावरून उठायची

वेळ आली हे समजायचं

 

माझा नवरा असा…तसा… आहे

सगळ्यांना सांगायचं

नवरा समोर आला की

व्हा जरा बाजूला म्हणायचं

 

मतलबाचं काम असलं की

लाडात येऊन

अहो, जरा ऐकलं का? म्हणायचं

मतलबाचं काम नसलं की

घराच्या बाहेर हाकलायचं

 

बरं दुसरं असं की

जरी होतो मी तिचा नवरा

तरी म्हणायची तुमच्या पेक्षा

माझा भाऊजीच बरा

 

भाऊजीला होतं टक्कल

तरी म्हणायची

तुम्हाला नाही कवडीची अक्कल

 

तिचा भाऊजी होता हुशार

जगापुढे होता शेर

पण,

बायको पुढे होता बिचारा लाचार

 

जेव्हा तिचं नी माझं खटकायचं

भाऊजी पुराण सुरू व्हायचं

मी हटकलं की शुन्य मिनिटांत संपायचं

 

जगापुढे मांडायची संसाराची व्यथा

तरी पण

आम्ही सुखात कसा करतो संसार

सांगायची साऱ्यांना कथा

 

कथा ऐकायला भरायचा

आमच्या घरात गोपीकांचा बाजार

आणखी शेजार पाजारचे दोन चार

 

कितीही म्हटलं तरी

ती माझी बायको आणि

मी तिचा नवरा

हे तिला कळायचं

तसं मन आमचं जुळायचं

 

पण तरीही

तिचं नेहमीच असं असायचं

माझ्या सोबत रहायचं

अन् कौतुक दुसऱ्याचं करायचं

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर,धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा