You are currently viewing पुस्तक मनोरा….

पुस्तक मनोरा….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुस्तक मनोरा….*

 

पुस्तकांचा हा मनोरा,

बालके चढण्यास सिध्द ..

वाचनाची स्फूर्ती देईल,

काव्य करण्या शब्द बध्द!

 

गोष्टीतला तो चांदोबा,

शास्त्रज्ञांनी कसा पाहिला?

कुतुहल त्याचे बालजनांना,

मार्ग त्याचा कसा शोधला?

 

वेताळाच्या गोष्टीतील राजा,

बाळ वेताळाला घाबरतो!

असा कसा हा राजा त्याच्या

खांद्यावर जाऊन बसतो!

 

भुताखेता ची वाचता पुस्तके,

भीतीचा काटा येई अंगावरी!

स्वप्नातही एखादे भूत येई ,

घेण्या त्याला खांद्यावरी !

 

वय वाढले थोडे थोडे,

पुस्तक प्रतिमा बदलू लागली!

कथा प्रवास कादंबरी ची,

वाचने आता आवडू लागली!

 

पुस्तकाचे विश्व अफाट,

मनास मोह घालू लागले!

पुस्तकाच्या मनोऱ्यावरी,

पाऊल भरभर चढू लागले!

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा