उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुरळीत न झाल्यास 26 ऑक्टोबरला धरणे आंदोलन
– युवा सेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचा इशारा
कणकवली
येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुर्या डॉक्टर व कर्मचा़र्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परिणामी सर्वसामान्य रुग्णांना याचा फटका बसत आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत ही व्यवस्था सुरळीत न झाल्यास रुग्णालयात समोर युवासेनेच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कणकवली तालुका युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी रुग्णालयाचे डॉक्टर किर्लोस्कर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे,युवासेनेचे
प्रतीक रासम,रोहित राणे,प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालयात सध्या अपुर्या कर्मचार्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रुग्णालयात 30 अधिपरीचारीका पदे मंजूर आहेत. त्यापैकी 21 पदे भरण्यात आली आहेत. त्यापैकी 6 जणांची बदली झाली असल्यामुळे कायमस्वरूपी 15 अधिपरीचारीका आहेत. ज्याची बदली झाली आहे. त्या जागी अजून दुसरे कर्मचारी हजर झाले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ व
भुलतज्ञ हे पद रिक्त आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्जरी होऊ शकत नाही. गोरगरीब रूग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागते. आस्थापना विभाग मध्ये वरीष्ठ लिपिक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी 8 पदे मंजूर असून 7 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर अद्याप कोणतेही कर्मचारी दिले नाहीत. त्यामुळे आस्थापना विभागामध्ये गैरसोय निर्माण झाली आहे. तसेच रुग्णालयात सी आर्म मशीन उपलब्ध नाही आहे. सी आर्म मशीन,डॉक्टर, अधिपरीचारीका व अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करावे, अन्यथा युवासेनाच्यावतीने २६
ऑक्टबरला रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*