सावंतवाडी वीज ग्राहक संघटनेची सभा बांदा येथे संपन्न
बांदा
बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची इन्सुलि सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांची बैठक संपन्न झाली.
इन्सुलि सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या बांदा, वाफोलि, शेर्ले, डेगवे, विलवडे, भालावल, डिंगणे, डोंगरपाल, गाळेल, नेतरडे, फोंडिये, इन्सुलि, मडुरा, रोणापाल, पाडलोस, सातोसे, आरोस, कास, ओटवणे, सरंबळे, असनिये, तांबोळी, कोनशी, दाभिल या गावांना विजे बाबत अनेक समस्या असल्याने येथील ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस बांदा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती प्रियांका परशुराम नाईक, बांदा उपसरपंच श्री. जावेद खतीब, वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा सचिव श्री निखिल नाईक, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक श्री . नंदन वेंगुर्लेकर, श्री. बाळ बोर्डेकर, तालुका अध्यक्ष श्री. संजय लाड, सदस्य श्री . संतोष तावडे, श्री. समीर शिंदे, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेश परब, रोणापाल माजी सरपंच श्री सुरेश गावडे, आरोस तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री राजन नाईक, बांदा व्यापारी संघाचे श्री मंगलदास साळगावकर, श्री सुनील देसाई, श्री अशोक देसाई, अमित गुळेकर, शांताराम काणेकर, श्री हनुमंत सावंत, श्री शिवराम राऊळ, श्री राजेश बांदेकर, श्री महादेव कदम, श्री दशरथ मळगावकर, श्री गंगाराम शेरलेकर, श्री शांताराम काणेकर, श्री सुरज राऊळ आदी उपस्थित होते.
या बैठकीत विविध गावातून आलेल्या वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची ग्राहकांसोबतची वर्तणूक, वीज सेवेची निकृष्टता, पुन्हा पुन्हा लाईट जाणे, भरमसाठ बिले, चुकीची बिले, वीज वितरणचे बिघडलेले नियोजन, विजेची अनियमितता, उपकरणांच्या देखभाली बाबत वीज महावितरणची उदासीनता अश्या अनेक प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून मांडण्यात आल्या व वीज वितरणच्या कारभारा बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
वीज ग्राहकांच्या तक्रारी समजून घेतल्यानंतर सर्वानुमते दिनांक 19 ऑक्टोबर व 20 ऑक्टोबरच्या दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन्सुली सबस्टेशन मधील ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
काल पार पडलेल्या वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक श्री नंदन वेंगुर्लेकर यांनी अल्पावधीतच वीज ग्राहकांच्या सहभागाने संघटनेमार्फत झालेल्या सकारात्मक कामाची माहिती दिली व संघटनेच्या कार्यपद्धती विषयी माहिती दिली; जिल्हा सचिव श्री निखिल नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यामागची संकल्पना व संघटनेची उद्दिष्ट्ये अधोरेखित करून संघटनेच्या बळावर ग्राहकांना आपले हक्क कसे मिळवून दिले जाऊ शकतील याची माहिती दिली. जिल्हा समन्वयक बाळ बोर्डेकर यांनी तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकून विविध नियमांची माहिती ग्राहकांना करून दिली त्यानंतर बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक यांनीही महावीतरणच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून वीज ग्राहक संघटना वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तत्परतेने काम करत असले बाबत संघटनेची प्रशंसा केली. पुढे बांदा उपसरपंच श्री जावेद खतीब यांनी ग्राहकांना उद्भवीणारे विविध प्रश्न मांडून वीज ग्राहक संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रोणापाल माजी सरपंच यांनीही यावेळी आपले विचार मांडले. जिल्हाध्यक्ष श्री श्रीराम शिरसाट व तालुकाध्यक्ष श्री संजय लाड यांनी उपस्थितांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले.
*संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*