You are currently viewing सहकाररत्न पी एफ डॉन्टस यांनी अनेकांना रोजगार देवून आमदारासारखे काम केले

सहकाररत्न पी एफ डॉन्टस यांनी अनेकांना रोजगार देवून आमदारासारखे काम केले

सहकाररत्न पी एफ डॉन्टस यांनी अनेकांना रोजगार देवून आमदारासारखे काम केले

सावंतवाडीतील शोकसभेत आदरांजली; सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत आठवणींना उजाळा…

सावंतवाडी

जिल्ह्यात सहकाराची चळवळ रुजविण्याबरोबर अनेकांना रोजगार देवून सहकार रत्न पी. एफ. डॉन्टस यांनी आमदारासारखे काम केले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श येणार्‍या पिढीने घ्यावा. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न येणारी आहे. त्यांचे विचार आणि कार्य कायम तेवत राहण्यासाठी सर्वांकडुन प्रयत्न व्हावेत, असे मत आज येथे आयोजित शोकसभेत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले. डॉन्टस यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आज येथील नवसरणी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी त्यांना आदराजंली वाहीली.

यावेळी शालेश शिक्षण मंत्री दिपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, फादर मिलेट डिसूझा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला प्रदेश अध्यक्षा अर्चना घारे -परब, एम. डी. देसाई, बाबुराव कविटकर, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष ऍड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर माजी नगराध्यक्षा अनारोजिन लोबो, माजी उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सैनिक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवराम जोशी, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, समीर वंजारी, मायकेल डिसोझा, एक्स सर्व्हिसेस लीगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, दिनानाथ सावंत, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र मडगांवकर, रुजॉय रोड्रिक्स, माजी सैनिक तातोबा गवस, डॉ. विलास सावंत, कॅथलिक बँकेचे सीईओ जेम्स बोर्जेस, चंद्रशेखर जोशी, सैनिक पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, दीपक राऊळ आजी – माजी सैनिक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. डॉन्टस यांनी राजकीय, सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामांना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दुरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख केली होती. त्यामुळे त्यांची सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले काम कधीही न विसरता येणारे आहे, असे विचार यावेळी मांडण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या सारखा माणूस आता होणे नाही. त्यामुळे सर्वांनी त्यांनी दिलेल्या पायवाटेवर चालून आदर्श काम करावे, असे आवाहन यावेळी उपस्थितांकडून करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा