You are currently viewing चूल..!

चूल..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी प्रो. डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*चूल..!*

 

होय ,

मी चूल !

अलीकडच्या काळात नामशेष झालेली मी चूल ! अजूनही कुठे कुठे माझं अस्तिव आहेच ! तस ते जगाच्या इतिहासात कोणत्या ना कोणत्या प्रकारे राहील यात तिळमात्र शंका नाही ! फार पूर्वीच्या काळापासून अस म्हणण्या पेक्षा मी यावत चंद्र दिवाकर ! जगाच्या अस्तित्वातच मी आहे ! माझं रूप अग्नी महाभूता पासून झालेलं ! सूर्य नारायण हेच त्याच प्रतीक ! अवकाशात माझं प्रतिबिंब !

तस धरतीच्या पोटात असलेला तप्त लाव्हारस हे पृथेवरच प्रतीक ! मी कुठे नाही ? चराचरात माझं अस्तित्व आहे ते अग्नी महाभूताच्या रुपात ! पाण्याच्या थेंबात पण मी आहेच ! काळ्याजर्द मेघात घर्षण झाले की मी रुपेरी सौंदमीनीच्या रुपात मी भूतलावर अवतरते ! माझं उष्ण दाहक रूप हे मानवाच्या हितकरता ! माझ्याशिवाय जीवनाची भट्टी

पेटत नाही ! मी आहे म्हणूनच आयुष्य आहे !

 

।।अहं ही वैश्वानरो देवो

प्राणिनांम देह आश्रिता ।।

।। प्राण आपनो समयुक्तम

पश्चमन्यांम चतुर्वीधम ।।

 

 

मीच तो अग्नी तुमच्या शरीरात राहून प्राण व अपान

वायूचे पोषण करतो व तुम्ही घेतलेल्या चतुर्वीध अन्नाचा पचन करतो ! शरीर पोषण म्हणजेच

जीवन यापन पण करतो .

ऋषीमुनींची मी आवडती ! त्यांनीच मला प्रथम ह्या पृथ्वीवर पचारण केल ! माझ्या आयुष्याचा अग्नी तृप्त करण्यासाठी मला वेळोवेळी समिधा अर्पण केल्या ! व माझी भूक भागवली !

होम यागादी कृत्यात मी प्रथम प्रविष्ट झाले ! ते नन्तर मग प्रत्येक प्राणिमात्रांची भूक भागवण्याचे श्रेय व काम माझ्याकडे जस आले , तसा माझा जन्म झाला ! मला चूल म्हणून नामकरण करण्यात आलं !

तसे कित्येक आकारात मी असले तरी , माझा मूळ आकार त्रिकोणीच ! तीन दगडाची चूल !! माझा अवतार हा मूळ आदी मायेचा ! विश्व साकारण्यासाठी माझी उत्पत्ती ! तीन कोन तीन दगड ! त्रिगुणात्मक माझी रचना ! सत्व रज तम !

तिन्ही गुणांचा समन्वय साधण्यासाठी अग्निरूपी इंधनाची तजवीज पण करून ठेवली !

अग्निप्रधान महाभूताचे प्रतीक असलेल आदिमायेच रूप म्हणजेच मी !!! माझ्या शिवाय आयुष्य हे अपूर्ण !

प्रचंड ज्वाळा उत्पन्न करण्याची क्षमता ! वेदनेची धग उष्णता चटके सोसण्यासाठी मला त्रिकोणी आकारात बंदिस्त व्हावं लागलं ! एकदा मी पेटले की

कुणाचेही ऐकत नाही ! येईल ते इंधन , मग ते कोणत्याही झाडाचं, असो त्याला भस्म सात करण्याची शक्ती मला देवांनी दिली ! मला शमविण्यासाठी ऋषी मुनीनी

दूध ह्या पूर्ण अन्न निवडले !

राखेच्या आड मी धगधगत असतेच !

चुलीच्या बंदिस्त वातावरणात , माझं काम योग्य होत असावे अस विश्वकर्म्यला

वाटले असावे .

माझा अन स्त्रीचा सम्बन्ध फार जुना आहे ! सक्ष्यात अन्नपूर्णा देवीनेच मला प्रगट केलं . भगवान शंकराला ज्यावेळी भूख लागली , त्यावेळेस मला पाचारण करून बोलवलं ! त्यावेळी पासूनच काम आजपर्यंत सतत चालूच आहे !

भूख ही मानवी प्राण्यांची गरज लक्ष्यात घेऊन , शाक पाक सिद्ध करण्याची जबाबदारी एकदम मला व पार्वती अन्नपूर्णेवर आली . हेच जगाच्या उत्पत्ती चे मूळ कारण असावे !

भूक भागवण्यासाठी प्रत्येक्षात शंकर म्हणाले होते

 

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां

देही च पार्वती ।।

 

माता च पार्वती देवी पिता देवो

माहेश्वरा ।।

 

भगवान शंकर म्हणतात ज्ञान व वैराग्य मिळवण्यासाठी मला भिक्षा वाढ ! मला सर्वज्ञान मिळू दे ! विश्व दर्शन पण होऊ दे व ते फक्त तुझ्यामुळे शक्य आहे .

 

जगाच्या संगोपनाची शक्ती , भूख भागवण्यासाठीची युक्ती फक्त माझ्यात व स्त्रीत्वात आहे ! मानवीय म्हणा किंवा पक्षी वा पशूंची म्हणा भूख ही अनेक प्रकारची आहेच . स्त्रीला चूल व मूल हे कधी चुकले आहे का ? मग ती स्त्री अडाणी असो वा शिकलेली असो , त्यातच तर जीवनाचे गुपित दडले आहे .

स्त्री काय किंवा मी काय , आमच्या दोघीत साधर्म्य आहेच म्हणूनच आमची निर्मिती ईश्वरीय आहे . आज माझं रुपडच बदलुन टाकलं आहे ! बर्शन ची शेगडी , इलेक्ट्रॉनिक शेगडी ,

सौर ऊर्जेची शेगडी , वाटर हिटर , मोठया पावाच्या भट्ट्या , तंदुरी, टर्बाईन , ही सर्व माझीच रूपे ! आहेत आणि सदैव राहतील ! फक्त मानवाची गरज भागविण्यासाठी !!!

 

 

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

अंकली बेळगाव

कॉपी राईट 29 जुलै 2023

प्रतिक्रिया व्यक्त करा