You are currently viewing पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्याविरुद्ध वन विभागाची कारवाई

पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्याविरुद्ध वन विभागाची कारवाई

पोपट व शेकरु यांना पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्याविरुद्ध वन विभागाची कारवाई

सावंतवाडी

सावंतवाडी माठेवाडा रोड, बाहेरचा वाडा येथे रहाणाऱ्या कैस अब्दुल लतीफ बेग याच्यावर अवैधरीत्या पोपट व शेकरू यांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्यामुळे सावंतवाडी वन विभागाकडुन कारवाई करण्यात आली.
सावंतवाडी मधील बाहेरचावाडा येथे एका इसमाने अवैधरीत्या संरक्षित प्राणी ताब्यामध्ये ठेवले असलेबाबत गुप्त बातमी वन विभागाला मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सकाळी सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर हे आपल्या गस्ती पथकासह संबंधित इसमाच्या घरावर छापा मारण्यासाठी गेले असता, त्या संशयित इसमाच्या घरच्या मागच्या बाजूला पोपट व शेकरू हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये संरक्षित प्राणी, त्याने पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव कैस अब्दुल लतीफ बेग असल्याचे व आपणच या प्राण्यांना बंदिस्त करून ठेवले असल्याचे मान्य केले.
त्या अनुषंगाने वन्यप्राणी व सदर इसमास चौकशीसाठी वनविभागाच्या टीमने ताब्यात घेतले. सदरची कारवाई ही उपवनसंरक्षक सावंतवाडी मा.नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद राणे, प्रमोद जगताप, पोलिस कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक महादेव गेजगे, दत्तात्रय शिंदे, प्रकाश रानगिरे, सागर भोजने, वैशाली वाघमारे, वाहन चालक नितीन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा