You are currently viewing कुडाळ येथे “विशालपर्व” कार्यक्रमाचा शुभारंभ थाटामाटात संपन्न

कुडाळ येथे “विशालपर्व” कार्यक्रमाचा शुभारंभ थाटामाटात संपन्न

कुडाळ :

 

विशाल परब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशालपर्व या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विशाल परब यांना निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

“विशाल याचा प्रवास लक्षात घेता तो नावाप्रमाणे मोठा होत चालला आहे.” अशाच पध्दतीने तुझी वाटचाल असू दे, तू माझ्या भावा सारखा आहेस, तुझ्या मनात ज्या काही इच्छा आहेत त्या पुर्ण होवू दे..!! अशा शुभेच्छा माजी खासदार निलेश राणे यांनी येथे आयोजित कार्यकमात दिल्या.

“तु राणे कुटुंबासोबत आहेस. त्यामुळे भविष्यात आम्ही सुद्धा तुझ्यासोबत असेच राहू. तुझी मेहनत अशीच पुढे सुरू ठेव यापेक्षा मोठा हो,” असा आशीर्वाद ही निलेश राणे यांनी परब यांना दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा