You are currently viewing काळाचा महिमा

काळाचा महिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*

 

*वनहरिनी वृत्त*

(८-८-८-८=३२)

 

*काळाचा महिमा*

 

कुठे थांबतो काळ जीवनी त्याच्या संगे चालत जावे

या जन्मीचे भोग भोगुनी आयुष्य कसे हसत जगावे ||धृ||

 

सत्मार्गावर चालत असता किती अडथळे खडतर वाटा

कुवत जयाची नसते तो पण दाखवितो बघ उगाच ताठा

दुष्ट अशा या प्रवृत्तींना गाडुनी पुढे जात रहावे

या जन्मीचे भोग भोगुनी आयुष्य कसे हसत जगावे ||१||

 

जो जो कोणी जन्मा येतो मरण तयाला अटळ सांगतो

उन्मत्त कधी झाला मानव की काळाचे नियम टाळतो

उतू नये अन् मातूच नये कर्म येथले चुकत नसावे

या जन्मीचे भोग भोगुनी आयुष्य कसे हसत जगावे ||२||

 

मदतीचा जो हात देतसे तयास मनुजा विसरुन जातो

अघटीत असे संकट येता काळ मनुष्या तिथे आणतो

वेळ बदलली तरी जुना तो काळ मनाशी स्मरत असावे

या जन्मीचे भोग भोगुनी आयुष्य कसे हसत जगावे ||३||

 

© दीपक पटेकर (दिपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा