देवस्थान कमिटीच्या आवाहनाला भक्तांचा प्रतिसाद
सावंतवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनुर्ली माऊली देवीचा या वर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून, देवस्थान कमिटीच्या आव्हानाला भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावर शुकशुकाट पसरला आहे. यावेळी देवी माऊलीच्या मंदिरात संपूर्ण फुलांची आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी मात्र स्थानिक लोकांना कडून सोशल डिस्टसींग पाळून ओटी भरण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या वर्षी मंदिर परिसरात दुकान व हॉटेल लावण्यास प्रशासनाची परवानगी नसल्याने मंदिर परिसर सुनासुना दिसत आहे. यावेळी स्थानिक लोकांची फक्त ४ दुकाने लावण्यात आली आहेत. तसेच तालुका आरोग्य पथकाने मंदिर प्रवेशद्वारावर सॅनिटायझर आणि थर्मल गन तपासणीस ठेवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येत आहे.