You are currently viewing आ. नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करा

आ. नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करा

*आ. नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करा*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मागणी*

*नितेश राणेंनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची गणेश गावकर यांनी केली तक्रार*

देवगड ग्रामीण रुग्णालयातील समस्यांसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना आमदार नितेश राणे व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून दमदाटी करून देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याप्रकरणी आ. नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेऊन करण्यात आली.

आमदार नितेश राणे व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून आपल्या जीवितास धोका असल्याबाबतची लेखी तक्रार देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे सादर केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेवक कन्हैया पारकर,देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संतोष परब, तेजस राणे, रिमेश चव्हाण,लक्ष्मण हन्नीकोड यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक व त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून बेकायदेशीर रित्या जमाव करून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच नितेश राणेंनी माझा हात पकडून मला इतर ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत होते त्यामुळे आमदार नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गणेश गावकर यांनी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून देवगड ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे व समस्यांबाबत पाठपुरावा करीत आहेत. सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बैठकी दरम्यान त्यांची भेट घेण्यासाठी देवगड रुग्णालयात ते गेले असता त्याठिकाणी आमदार नितेश राणे व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक तसेच काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरित्या जमाव करून गणेश गावकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच नितेश राणे हे गणेश गावकर यांचा हात पकडून जबरदस्तीने इतर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी देवगड पोलीस निरीक्षक श्री. नीळकंठ बगळे यांनी बघ्याची भूमीका घेऊन ते पक्षपाती कारवाई करताना दिसून आले. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण प्रसारमाध्यमातून नीदर्शनास येत आहे. या घटनेनंतर गणेश गावकर यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. श्री. नीळकंठ बगळे हे पक्षपाती भूमिकेतून नितेश राणे यांच्यासाठी काम करीत असल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाई करण्याची अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा