You are currently viewing श्रीस्वामी चरणी काव्यपुष्प

श्रीस्वामी चरणी काव्यपुष्प

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि.देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्रीस्वामी चरणी काव्यपुष्प

कविता- जय श्रीस्वामी समर्थ

——————————————

नाम ओठावरी यावे

जय श्रीस्वामी समर्थ ।।

अस्थिर मना शांतवाया

स्वामी नाम घेत जावे

गढूळ मन लगेच

निर्मळ शांतता पावे ।। १ ।।

 

सुख-दुःख उन्हापरी

नित्य येते आणि जाते

एकचित मनाने जपावे

जय श्रीस्वामी समर्थ ।। २ ।।

स्वामीभक्ताची कधी

टिंगलटवाळी होते

शांतपणे नाम घ्यावे

जय श्रीस्वामी समर्थ ।। ३ ।।

नाम ओठावरी यावे

जय श्रीस्वामी समर्थ ।।

————————————-

कविता- जय श्रीस्वामी समर्थ

-अरुण वि.देशपांडे-पुणे.

9850177342

———————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा