*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी स्वप्निल जांभळे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई बारोंडा देवी*
प्रथम तुला मी वंदितो
बारोंडा आई तुला पुजतो
बारोंडा देवी बसले डोंगरावरी
तिची नजर आहे भक्तांवरी
तुझ्या पायथ्याशी विरार वसलय शहर
सदा असुदे कायम आई तुझी नजर
असे वाटते रोज व्हावे तुझे दर्शन
मंदिरात आल्यावर मन होते प्रसन्न
निसर्गाने नटलेला हा आजूबाजूचा परिसर
लक्ष वेधून जातो आई तुझे सुंदर मंदिर
बारोंडा आई तुज्या डोळ्यासमोर
छोटी बहीण जीवदानी आईचे उभे मंदिर
तुझ्या चरणाशी माथा मी टेकतो
सर्वांना सुखी ठेव एव्हढेच गाऱ्हाणे घालतो
हाती भस्म घेऊन फासतो माथ्यावर
आई आशिर्वाद असो सर्व भक्तांवर
आई तुझा गाभाऱ्यात आरती ओवाळतो
जगण्यास शक्ती मिलुदे हीच प्रार्थना मी करतो
फुल नाही पण फुलाची पाकळी वाहिन
तूझ्या भक्तांच्या मनोकामना कर पूर्ण
कवी:स्वप्नील चंद्रकांत जांभळे
ता. दापोली, जि. रत्नागिरी, मु. पो. शिरखळ, गाव. हातीप (तेलवाडी)
मो.९६१९७७४६५६