You are currently viewing सावंतवाडीतील रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञपदी गोविंद श्रीरामे

सावंतवाडीतील रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञपदी गोविंद श्रीरामे

सावंतवाडीतील रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञपदी गोविंद श्रीरामे…

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रिक्त असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञपदी गोविंद श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी कार्यभार स्वीकारला. याबाबतचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले.

गेले काही दिवस हे पद रिक्त असल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागला होता. त्यामुळे ते पद तात्काळ भरण्यात यावे, रुग्णांला दिलासा देण्यात यावा, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना व रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा