*भारताची सागरी क्षेत्रातील महाशक्तीकडे वाटचाल*
श्रीपाद नाईक ः “एमआयटी एडीटी’ “मॅनेट’तर्फे जागतिक सागरी सप्ताह साजरा
पुणे
“भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे समुद्र हा कायमच आपल्या संपत्ती व समृद्धीचा स्त्रोत राहिलेला आहे. त्यात भारतातील 85 टक्क्यांपेक्षा अधिक खलाशी हे विदेशातील सागरी क्षेत्रात कार्य क्षेत्रात कार्यरत असून त्यात महिला खलाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भारत सागरी क्षेत्रातील महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत असून हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिभाषेतील देशाचा अमृतकाळ आहे,’ असे मत पोत परिवहन व जलमार्ग खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या महाराष्ट्र ऍकेडमी फॉर नॅवल एज्युकेशन व ट्रेनिंग(मॅनेट)च्या जागतिक सागरी सप्ताहा निमित्ताने बालगंधर्व रंगमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, शिपिंग विभागाचे महासंचालक श्याम जगन्नाथन, सिनर्जी मरिन ग्रुपचे कॅप्टन डॉ.शशांक जहागिरदार, शिपिंगचे उपमहासंचालक डॉ.पांडूरंग राऊत, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, कॅप्टन आशा एस. अलगप्पा, कॅप्टन केदार चौधरी, कॅप्टन श्रीरंग गोखले, संजीव ओगले, सुहास मते, मिनिनाथ झगडे, उदय पुरी, उदय सुभेदार, राजाराम लहाने, गजानन केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले, मर्चेंट नेव्हीमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ट्रेनिंग दरम्यान 1 लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे अधिका-अधिक महिलांना या क्षेत्राकडे वळविण्याचा सरकारचा मानस आहे. “एमआयटी मॅनेट’ ही मर्चेंट नेव्ही क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था आहे. तरी मॅनेटच्या सप्ताहाच्या माध्यमातून मी सर्व कॅडेट्सला जागतिक सागरी दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो.
श्याम जगन्नाथ यावेळी म्हणाले की, मॅरिटाईन महाशक्ती म्हणून भारत वाटचाल करत असल्याने कॅडेट्सला या क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच या क्षेत्राकडे वळायला हवे. तसेच, “मॅनेट या संस्थेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे, हे ऐकूण आनंद झाला. समुद्राच्या मध्यभागी इतकी मोठ-मोठी जहाजे व त्यांची इंजिन सांभाळने ही नक्कीच सोपी गोष्ट नसते, त्यासाठी मोठी हिम्मत लागते. त्यामुळे, या क्षेत्राची भीती, लाज न बाळगता त्याचा अभिमान बाळगायला हवा,’ असे कॅप्टन आशा अलगप्पा यांनी म्हटले.
“मॅनेट’चे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक तर कॅप्टन राजीव काशिकर यांनी आभार मानले. तसेच, याप्रसंगी बालगंधर्व रंगमंदीर पासून जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता मार्गे मॅनेटच्या कॅडेट्सनी काढलेल्या प्रबोधन फेरीने पुणेकरांची लक्ष वेधून घेतले.
*चौकट*
विद्यार्थ्यांनी मर्चेंट नेव्हीकडे वळावे- प्रा.डॉ.कराड
“मरिटाईम हा जगातील अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. त्याचा जागतिकीकरणात मोठा वाटा आहे. भारतातील सागरी व्यवसायाला वास्को द गामा पासून मोठा इतिहास आहे. परंतू सध्या आयटी क्षेत्रातील नोकरीच्या वाढत्या संधींमुळे विद्यार्थी मर्चेंट नेव्हीकडे दुर्लेक्ष करत आहेत. ही नोकरी आव्हानात्मक असली तरी ती प्रचंड मानसन्मान मिळवून देणारी देखील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे. “मॅनेट”च्या माध्यमातून “एमआयटी एडीटी’ने आत्तापर्यंत 3400 पेक्षा अधिक अधिकारी घडविल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’ असे मत प्रा.डॉ.मंगेश कराड यावेळी मांडले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*