You are currently viewing क्षण आयुष्यातले

क्षण आयुष्यातले

क्षण आयुष्यातले

काही क्षण
माझ्या आयुष्यातले
कधी खळखळून हसवतात
तर कधी दुःखाना कवटाळत
अश्रु होऊन वाहतात.

काही क्षण..
माझ्या आयुष्यातले,
कधी माझ्या दुःखांवर
प्रेमाने फुंकर मारतात
तर कधी सुकलेल्या जखमाही
हळूच ओल्या करून जातात.

काही क्षण..
माझ्या आयुष्यातले,
कधी बंद डोळ्यांनी मला
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जातात
तर कधी उघड्या डोळ्यांनी
तिच स्वप्न उधळून लावतात.

काही क्षण..
माझ्या आयुष्यातले,
कधी मला रात्र रात्र जागवतात
तर कधी दिवसा उजेडी माझ्या
डोळ्यांवर पांघरुण घालतात.

काही क्षण..
माझ्या आयुष्यातले,
कधी तुझी आठवण करून देतात
तर कधी तुझ्या आठवणीत
मला सर्वस्व विसरायला लावतात.

काही क्षण..
माझ्या आयुष्यातले,
कधी मला प्रेमाने गोंजारतात
तर कधी अनोळख्यासारखे
दुर्लक्ष करून जातात..

दीपी…
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा