छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आता मालवणच्या ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर
मालवण
येत्या डिसेंबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘नौसेना दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता येथील ‘राजकोट’ या किल्ल्यावर उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची या निमित्ताने पुनर्बांधणी होणार आहे. शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी येथील ‘हॉटेल ऐश्वर्य’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी अवि सामंत, रवींद्र खानविलकर, मंगेश जावकर, सहदेव बापर्डेकर, भूषण साटम, सुरेश बापर्डेकर, अभय पाटकर, सहदेव साळगावकर, शेखर गाड, दर्शन वेंगुर्लेकर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केल्यानंतर त्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता. आता ढासळत चाललेल्या ‘राजकोट’ किल्ल्याची ३५० वर्षांनंतर पुनर्बांधणी, तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने हा क्षण समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद आहे.’’
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*