You are currently viewing वैभववाडीत विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

वैभववाडीत विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

वैभववाडी
शहरात विनामास्क फिरणाऱ्या 20 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये स्थानिक नागरिक व वाहनचालक यांचा समावेश आहे. कारवाईच्या भितीने सर्वजण मास्कचा वापर करु लागले आहेत.
येथील संभाजी चौकात पोलीस निरीक्षक अतुल जाधव, एएसआय श्री. सावंत, हवालदार विलास राठोड, संदीप कांबळे, श्री. बिल्पे यांनी ही कारवाई केली आहे. वाभवे – वैभववाडी नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी व छाननीच्या दिवशी येथील तहसील कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यानही पोलीस निरिक्षक अतुल जाधव यांनी मास्क न वापरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. कारवाईच्या भीतीने अनेक जण आता मास्क वापरु लागले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा