You are currently viewing घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न

घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न

घराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!

घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी गावात ही खळबळजनक घटना घडली आहे.

या प्रकरणामुळं गावात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपूर्ण घराला ११ केव्हीचा करंट देऊन कुटूंबाला जीवे मारण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र एकाच वेळी ११ केव्ही विजेवर करंट दिल्यामुळे विद्युत वितरण कंपनीची संपूर्ण गावाची वीजच बंद पडल्यामुळे सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले आहे. गावातील निकम कुटुंबाबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय घडलं नेमकं?

रात्री सगळे साखरझोपेत असताना अचानकपणे एक वाजण्याच्या सुमारास विद्युत ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर सर्व वीज गेले. निकम कुटुंबीयांना घराजवळच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळं काहीतरी झाले असेल असं समजून निकम कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण पुन्हा ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाचा आवाज आला त्यावेळी निकम कुटुंबीय खडबडून जागे झाले.

नक्की काय झाले हे पाहण्यासाठी ते बाहेर आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समोरच्या ट्रान्सफॉर्मरवर अनेक वायर लटकत असल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी अज्ञात लोक दोरीच्या सहाय्याने विजेच्या तारा घराजवळ ओढून टाकत असल्याचं पाहायला मिळाले. पण त्याचवेळी निकम कुटुंबीय जागे झाले असून घराजवळ उभे आहेत ही आरोपींच्या लक्षात आले. त्यानंतर अज्ञातांनी तिथून पलायन केलं.

दरवाजाजवळ विद्युत तारा लावल्या

घराजवळ अज्ञात लोक दिसल्याने निकम कुटुंबीयांना थोडा संशय आला. तेव्हा त्यांना काही तर घडत असल्याचं लक्षात आलं. यावेळी सजगपणे त्यांनी घराच्या आजूबाजूला पाहणी केली. तेव्हा घराच्या दोन्ही बाजूच्या दरवाजांना विद्युत तारा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे काबी तरी भयंकर असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा विचार केला. या प्रकरणी सुरज निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामध्ये कुटुंबाला जीव मारण्याच्या प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर बाबतचा तपास सुरू असल्याचं चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे. दरम्यान या मागे नक्की कोण सूत्रधार आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा