You are currently viewing ॲड. सुमित जाधव ‘संविधान रत्न’ पुरस्काराने सन्मानित…

ॲड. सुमित जाधव ‘संविधान रत्न’ पुरस्काराने सन्मानित…

ॲड. सुमित जाधव ‘संविधान रत्न’ पुरस्काराने सन्मानित…
.
मालवण

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तळेगाव ( ता. मावळ जि. पुणे) ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे १२५ वे वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त वकिली क्षेत्रात योगदान देणाऱ्या वकिलांचा वडगाव माळगाव येथे सन्मान करण्यात आला. मालवण – वायरी आडवण येथील ॲड. सुमित काशिनाथ जाधव यांना ‘संविधानरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रंजना भोसले, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार तुकाराम मोरे, सचिव किसन थुल आदी उपस्थित होते. ॲड. जाधव यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा