You are currently viewing कळसुलकरमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी…

कळसुलकरमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी…

कळसुलकरमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी…

सावंतवाडी

येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ते सुश्मिता चव्हाण यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या ऐतिहासिक कार्याविषयी विद्यार्थांना माहिती करून दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण मानकर, उच्च माध्यमिकचे शिक्षक उत्तम पाटील, सूर्यकांत भुरे, अनिल ठाकर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ठाकर यांनी तर श्री. भुरे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा