You are currently viewing पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म – “स्वामी” संस्थेचा स्तुत्य उपक्रम

पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म – “स्वामी” संस्थेचा स्तुत्य उपक्रम

मुंबई :

 

भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती जिवंत असताना विविध कर्मकांडातून आणि धर्माचे पालन करून मानवी जीवन सुधारण्याचे मार्ग सांगतेच, पण मृत्यूनंतरही, अंतिम संस्कारांनंतरही ती आपल्याला आत्म्याच्या उद्धारासाठी कोणकोणत्या कर्मकांड केले पाहिजेत याबद्दल सांगते. आपल्या शास्त्रात आणि पुराणात मरणोत्तर विधी आणि संस्कारांचे वर्णन केले आहे. अश्विनचा कृष्ण पक्ष (गुजरात-महाराष्ट्रानुसार भाद्रपद) हा आपल्या हिंदू धर्मात श्राद्ध पक्ष म्हणून साजरा केला जातो. विष्णू, वायू, वराह, मत्स्य इत्यादी पुराणांमध्ये आणि महाभारत, मनुस्मृती इत्यादी धर्मग्रंथांमध्ये श्राद्धाचा महिमा आणि पद्धत विविध ठिकाणी वर्णन केलेली आहे. पूज्यश्रींचे उपदेश प्रस्तुत पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत जेणेकरून सर्वसामान्यांना ‘श्राद्धा महिमा’ची ओळख व्हावी आणि त्यांच्या पूर्वजांप्रती असलेले कर्तव्य पार पाडता यावे.

 

दैवी पूर्वजांच्या पवित्र आशीर्वादाने, दैवी आत्मा तुमच्या कुटुंबात अवतार घेऊ शकतात. ज्यांनी आयुष्यभर एवढं रक्त आणि घाम गाळून तुम्हाला अनेक साधनं आणि मूल्ये दिली त्यांच्याप्रतीचं सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा त्या पूर्वजांच्या सुखासाठी, भगवंताच्या आनंदासाठी किंवा शुद्धीकरणासाठी हे श्राद्ध निःस्वार्थपणे केलं पाहिजे.

 

गेली अनेक वर्ष समाजकार्यात अग्रेसर असलेली “सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हार्यमेंट”चे संक्षिप्त रूप असलेली ‘स्वामी’ या मुंबईतील परळ भागातील संस्थेतर्फे पितृपक्षात अन्नदान करून मातृभाव जागविणारा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत मुंबईत विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी देशभरातून येणाऱ्या रुग्णांना आणि निराधार असणाऱ्या त्यांच्या नाई नातेवाईकांना स्वामी संस्थेच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पितृपक्षात अन्नदान कार्यक्रम राबविण्यात येतो. केवळ पितृपक्षातच नाही तर वर्षभर नियमित हे अन्नदानाच पुण्यकर्म सुरू असते. दर आठवड्याला गरजूंना तीन किलो तांदूळ व अर्धा किलो डाळ इ. साहित्याचे वाटप केले जाते. त्यासाठी समाजातील दानशूरांचे अर्थसाध्य लाभते. प्रामाणिक आणि पारदर्शक कार्य करणार्‍या या स्वामी संस्थेची समाजाच्या विश्वासावरच आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे.

 

आपणही संस्थेच्या अन्नदान कार्याला हातभार लावूयात, ‘विज्ञानाला विवेकाची जोड देत आईवडिलांच्या स्मृती केवळ पितृपंधरवड्या पुरत्या न ठेवता कायमस्वरूपी जतन करूयात. ‘हे विश्वचि माझे घर’ हे संतवचन प्रत्यक्षात आणूया. प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश असतो त्यामुळे त्याची सेवा ही ईश्वरसेवाच नाही का?

 

आपण आपल्या सद्सद्विवेक बुध्दीस स्मरून सामाजिक बांधिलकीच्या रुपात या महायज्ञात सामील होऊन आपले अमूल्य योगदान देवू शकता. आपण धान्य/रोख रक्कम/ धनादेश /आरटीजीएस/एनइएफटीद्वारे किंवा प्रत्यक्ष येवून शक्य ती मदत करू शकता. त्याची पावती आपणास त्वरित मिळेल. तसेच उपस्थित राहून स्वहस्ते गरजूंना अन्नदान करता येईल. आपण दिलेल्या देणगीला ८०जी अन्वये आयकर सवलत मिळणार आहे.

 

स्वामी संस्थेचे कार्यकर्ते या उपक्रमासाठी अनेक वर्षे सेवा देत आहेत. आपणही त्यांच्या साथीने या महतकार्यात आपला खारीचा वाटा उचलूया.

 

करोना काळातही “स्वामी” संस्थेने मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्याने बेघर रुग्णांना हजारो किलो मोफत शिधावाटप तसेच पोलिसांना चहा, नाष्टा, पाणी, जेवण पुरवून मानवता धर्म जपला. त्याबद्दल त्यांना “कोरोना योध्दा प्रशस्तीपत्र” देऊन गौरविण्यात आले. इ.स.२०२२ मध्ये ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ तर्फे सर्वोत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला.

 

पॅथोलॉजी, औषधपेढी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, विद्यार्थी सहाय्य योजना, आरोग्य तपासणी शिबिरे, दिवाळी फराळ, गणवेष वाटप, पर्यावरण प्रकल्प, रुग्ण सेवा केंद्र, अवयवदान-देहदान चळवळ, मातृभाव – अन्नदान अशा अनेक कार्यांद्वारे “स्वामी” संस्था समाजसेवेसाठी व्रतबंध राहून हे सर्व उपक्रम वर्षभर सातत्याने राबवत असते. हे सर्व निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या निरपेक्ष सेवेचे फलीत! त्यांना यासाठी उदंड शक्ती लाभो!!

 

मदत पाठवण्याचा पत्ता :-

“सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हार्यमेंट” ‘स्वामी’

गाळा क्र.१५, तळमजला, ३, मदिना मंजिल, पोस्ट गल्ली, बँक ऑफ बडोदा जवळ, परळ, मुंबई – ४०० ०१२.

भ्रमणध्वनी :- ८९२८०६१३९१

ईमेल :- Swamee2016@Gmail.com

———————–

ऑनलाईन देणगी पाठवण्यासाठी :-

स्वामी सोशलवर्कर्स असोसिएशन

बचत खाते क्र. ९९३५०१०००१२५१

बँक ऑफ बरोडा, परळ शाखा

IFSC – BARB0DBPARE

 

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा