You are currently viewing नशाबंदी मंडळाचा देशाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नशाबंदी मंडळाचा देशाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

*नशाबंदी मंडळाचा देशाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन*

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग, समाज कल्याण विभाग व शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन झाल्यानंतर व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली व्यसनाधीनता लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी असे विविध उपक्रम नेहमीचआयोजित करत असते . अशाच पद्धतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमात सर्व शाळा महाविद्यालये सहभाग घेऊन व्यसनमुक्ती कार्याच्या प्रचार प्रसार मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी शाळा महाविद्यालयांनी ध्वजवंदनानंतर व्यसनमुक्तीची शपथ देण्याचा कार्यक्रम करून त्याचे फोटो, व्हिडिओ शाळा महाविद्यालयाच्या नाव व पत्त्यासह नशाबंदी मंडळाकडे ९४२०२६११९६ या व्हाट्सअप नंबर वर पाठवावेत, या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळा महाविद्यालयांना नशाबंदी मंडळाकडून व्यसनमुक्तीच्या प्रबोधन कार्यात आपला सहभाग नोंदविल्याबद्दल आपल्याला ऑनलाइन प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. त्यासाठी या उपक्रमात जास्तीत जास्त शाळा महाविद्यालयांनी सहभागी होऊन सहकार्य करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा