You are currently viewing आईचा डबा

आईचा डबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आईचा डबा*

 

*आईचा डबा* या दोन शब्दात माझ्या बालपणाचा मोठा हिस्सा एकवटलेला आहे. जीवनातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरच्या अनंत आठवणी या आईच्या डब्यात आजही साठलेल्या आहेत.

 

*आईचा डब्बा* म्हटलं की मी शाळेच्या त्या मोकळ्या पटांगणात जाऊन पोहोचते. कोपऱ्या कोपऱ्या वरची आंब्याची, पिंपळाची, नीमची झाडं माझ्या मनात डुलायला लागतात आणि त्या झाडांच्या खाली, पारावर मित्र मैत्रिणी समवेत मधल्या सुट्टीत खाल्लेला *आईचा* *डबा* आजही आठवतो.

 

काही दिवसांपूर्वी मी अमेरिकेत असताना माझी मुलगी सकाळी उठून माझ्या नातीचा डबा तयार करत होती. एका डब्यात स्नॅक्स आणि दुसऱ्या डब्यात लंच. मी सहज मुलीला विचारलं एवढासाच डबा? सगळे मिळून खात असतील ना? तेव्हां ती म्हणाली!

” नाही ग मम्मी! इथल्या शाळांमध्ये एकमेकांच्या डब्यातून खाण्याची परवानगी नसते!”

 

“मग काय मज्जा? आईचा डबा ही काय एकट्याने खाण्याची बाबच नाही.”

हे मी मनातच म्हटलं.

मग संवाद थोडा वाढला. माझी मुलगी थोडी तिच्या बालपणात, तिच्या शालेय जीवनात रमली. म्हणाली “मम्मी! शाळेतले तुझ्या हातचे डबे मला अजूनही आठवतात. डब्यात पोळी भाजी देण्याचा तुझा आग्रह असायचा पण कधी कधी थालीपीठ, इडली चटणी, ढोकळा उपमा, पोहे असेही तू द्यायचीस. तुला कसं सुचायचं रोज डब्यात काय द्यायचं ते! परवा माझी मैत्रीण सोनलचा फोन आला होता. अशाच आईच्या डब्या विषयीच्या आठवणी निघाल्या आणि ती सहज म्हणाली, अगं तुझ्या मम्मीच्या हातचा ब्रेडचा चिवडा मला किती आवडायचा नं! अजुनही आठवतो.”

“तू इथे येतेस, काही महिने राहतेस पण रोज ऑफिसात जाताना अजूनही तू मला डब्बा बनवून देतेस. अगदी शाळेतल्या डब्ब्यासारखा. शेवटी आईचा डब्बा तो आईचा डब्बा. त्याची सर कुठल्याच टिफिनला नाही. आणि तुझ्या इथल्या वास्तव्यातली माझ्यासाठी सर्वात आवडणारी आणि हवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे तू दिलेला डबा, तो करण्याचं तुझं कौशल्य, भरण्याचा नीटनेटकेपणा शिवाय नेमक्या माझ्या आवडीनिवडीचा केलेला विचार. मम्मी! यु आर सिंपली ग्रेट! साधा चटणी पोळीचाच रोल पण किती ग टेस्टी. कोणत्याही उत्तम रेस्टॉरंट मध्ये इतके छान, पोट भरणारे, आत्म्याला तृप्त करणारे खाद्य मिळणारच नाही. खरंच थँक्स मम्मी. पण तुला एक सांगू मला कधी कधी खूप गिल्टी वाटतं ग! तुला याही वयात मी हे करायला लावते. पण मी कुठे ग तुला करच म्हणून सांगते. तूच करतेस. हो ना मम्मी?”

 

“आई आहे ना मी तुझी?अग, माझ्याही आईने माझ्यासाठी केलंच ना?” मी पण क्षणाचाही विलंब न लावता तिला असं उत्तरही दिलं.

 

आईच्या मायेची, वात्सल्याची ही परंपरा खरोखरच अखंडित आहे. आणि त्याची साक्ष देणारा हा *आईचा डब्बा* खरोखरच प्रातिनिधिक स्वरूपात आजही तसाच आहे.

 

माझं लग्न झालं आणि व्यवसायानिमित्त आम्ही दोघांनी वेगळं घर घेतलं. त्यावेळी आईने हौसेने खूप नवी, नव्या प्रकारची नव्या धाटणीची भांडी आणली होती माझ्यासाठी. ” हे बघ —हे तुला आवडेल, हे याच्यासाठी, हे त्याच्यासाठी, “वगैरे वगैरे अगदी खुलवून खुलवून मला सांगत होती. तेव्हा मी तिला इतकंच म्हटलं, “आई मी शाळेत न्यायची तो माझा कडीचा स्टीलचा डब्बा दे ना मला.”

 

खरं म्हणजे शाळा, कॉलेज, नंतर नोकरीच्या ठिकाणी आईचा डबा असायचाच. नोकरीसाठी मी ठाण्याहून मुंबईला फोर्ट मध्ये जायची. डब्बा वाला (मुंबईचे प्रसिद्ध डबेवाले) मी घरून निघायच्या आधी माझा डबा घेऊन जायचा. पण आईमुळे एकही दिवस डबेवाल्याला उशीर झालाय किंवा तो थांबलाय असं झालं नाही. आज आईच्या या तत्परतेच, तिच्या अपार मायेचं,कष्टाचं अतिशय अप्रूप वाटतं. “आईचा डबा” याविषयी आई बद्दलची जी गृहीत भावना त्यावेळी होती ना त्याविषयी आता खूप अपराधीही वाटतं.

 

न खाल्लेला, परत घरी आलेला डब्बा पाहून आई विचारायचीच,” का ग? आज डबा का नाही खाल्लास? आवडला नाही का?”

” अगं आई आज अचानक सर्वांनी बाहेर जाऊन जेवायचं ठरवलं म्हणून तू दिलेला डबा तसाच राहिला.”

त्यावेळी नव्हतं जाणवलं पण आज जाणवत आहेत ते तिच्या डोळ्यातले भाव! माझ्या दृष्टीच्या आतल्या दृष्टीत ते आजही रजिस्टर्ड आहेत. आज ते डोळे आठवले की मन विलक्षण कातरतं. त्या नजरेत राग नव्हता, चीड नव्हती, कुठल्याही प्रकारचा वैताग नव्हता, तक्रार नव्हती, विद्रोह नव्हता, समंजसपणाच होता पण तरीही या सर्व भावभावनांच्या मागे निश्चित एक दुखावलेपण होतं आणि त्याची जाणीव आज मला होते.

 

माझ्या स्वयंपाक घरात काचेची तावदानं असलेल्या कपाटात अगदी दर्शनीच मी तो कडीचा, स्टीलचा दोन खणी जो शाळेत न्यायची तो डबा सांभाळून ठेवलेला आहे. मी त्याच्यावर कधीही धूळ बसू देत नाही. तो रिकामाच ठेवला आहे. पण तो रिकामा आहे केवळ इतरांसाठी. माझ्यासाठी तो आजही सदैव भरलेलाच आहे. त्यात आईने वेळोवेळी माझ्यासाठी भरलेले विविध पदार्थ आहेत. चविष्ट बटाट्याची काचरा भाजी, परतलेली गवार, खमंग, हळदीचा वास असलेली अर्धी कच्ची कोबी, कधी भोपळ्याची खीर, पुरणाची पोळी नाहीतर तिच्या हातची लुसलुशीत घडीची चपाती. दाणेदार साबुदाण्याची खिचडी, त्यासोबत नारळाची चटणी. अमृताची चव होती या सगळ्याला. या आठवणीने आजही तोंडाला पाणी सुटतं. साधी भेंडीची भाजी असेल पण आईच्या डब्यातल्या,त्या लोखंडाच्या कढईत केलेल्या भेंडीच्या भाजी सारखी भाजी मला आज पर्यंत जमलेली नाही. तो “आईचा डबा” मग तो कुठेही खाल्लेला असो! शाळेच्या पटांगणात, बहरलेल्या झाडांच्या पारावर, मैत्रिणींच्या सोबत, अथवा कॉलेजच्या लेडीज रूममध्ये नाहीतर ऑफिसच्या डायनिंग रूममध्ये आणि फार कशाला प्रवास ट्रेनचा असो अथवा विमानाचा असो पण प्रत्येक ठिकाणी आईच्या डब्याने सदैव चविष्ट सोबत केलेली आहे. आज जेव्हा या आठवणी अंतरात घोळतात तेव्हां एक विचार मनात येतो हा नुसताच “आईचा डबा” होता का? पोट भरून खायला देणारा? की या पलीकडे त्यात काही होतं? या पलीकडे या डब्याने आपल्याला काही दिलंय का?

 

हो! नक्कीच खूप दिलय.

” आईचा डबा” एक संस्कार होता. मायेचा,प्रेमाचा,जिव्हाळ्याचा,आपुलकीचा. याच डब्यानं आपल्या जवळच जे काही असेल ते सर्वांमध्ये वाटण्याची प्राथमिक शिकवण दिली. आत्म्याची तृप्ती काय असते हे शिकवलं. हा डबा म्हणजे आईच्या भूमिकेचं महत्त्व सांगणारा, आई म्हणजे काय असते, आईपण म्हणजे काय याची व्याख्या सांगणारा, आपल्या प्रियजनांसाठी करताना होत असलेला आनंद काय असतो हे सांगणारा एक संस्कारशील वस्तुपाठ म्हणजे हा डबा आहे असं मला वाटतं.

 

परवा माझा पुतण्या मला सांगत होता, “काकू, *आईचा डबा* असं एक ॲप आलेलं आहे. ते डाऊनलोड करा. सगळे घरगुती पदार्थ तिथे मिळतात. नाश्ता, जेवण अगदी सगळं काही. आणि होम डिलिव्हरी आहे. ४.५ रेटिंग आहे त्यांचं. बघा ट्राय करून,”

 

असेल.

पण या माझ्या, नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुतण्याला काय सांगू? अरे “आईचा डबा” हे ॲप काही नवीन नाही माझ्यासाठी. माझ्यासाठी ते अनेक वर्षांपूर्वीच डाउनलोड झालेलं आहे…

 

राधिका भांडारकर पुणे

 

 

*संवाद मिडिया*

 

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

 

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

 

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

 

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

 

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

 

*सुविधा :*

 

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

 

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

 

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

 

▪️भूकंपरोधक बांधकाम

 

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

 

▪️आकर्षक लॉबी

 

▪️लिफ्टची सोय

 

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

 

▪️पाण्याची 24 तास सोय

 

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

 

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

 

▪️अंतर्गत भुयारी गटारे

 

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

 

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

 

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

 

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

 

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

 

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

 

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

 

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा