You are currently viewing ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

 

चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, लठ्ठपणा संधिवात या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व आजारांवर वेळीच निदान, उपचार केल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी माधवबाग शाखांद्वारे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वरील आजाराने त्रस्त असलेल्या तसेच अँजिओप्लास्टी व बायपास चा सल्ला दिलेल्या ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत करण्यात आले आहे. या तपासणीमध्ये ब्लडप्रेशर, ब्लडशुगर (रँडम), हार्ट रेट व वैद्यकीय सल्ला तसेच गरजेनुसार ECG, TMT या तपासण्या मोफत केल्या जातील. तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे माधवबाग परिवाराकडून आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी माधवबाग कणकवली – 9373183888, कुडाळ – 9011328581, सावंतवाडी – 7774028185 या नंबर वर संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा