You are currently viewing एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सण उचल रक्कम

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सण उचल रक्कम

आमदार नितेश राणे यांची व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या सोबत झाली चर्चा

भाजपा जिल्हा कामगार आघाडी सिंधुदुर्ग चे संयोजक अशोक राणे यांना वेधले होते लक्ष

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सण उचल रक्कम मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचेशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या सणासाठी कर्मचाऱ्यांना सन उचल रक्कम गरजेची असते. म्हणून सण उचल रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या काही दिवसातच ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाईल असे आश्वासन शेखर चन्ने यांनी दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस. टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सद्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव साजरा करीत असताना सण उचल न मिळाल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.याबाबत भाजपा जिल्हा कामगार आघाडी सिंधुदुर्ग चे संयोजक श्री. अशोक राणे यानी एस. टी. कर्मचाऱ्यांसह आमदार श्री. नितेशजी राणे यांची भेट घेऊन त्याना सण उचल न मिळाल्याची समस्या लेखी निवेदनाद्वारे सादर केली. त्यानुसार आमदार श्री. नितेशजी राणे यानी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांचेशी संपर्क साधून सण उचल त्वरीत देण्याबद्दल चर्चा केली असून लवकरच ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आमदार श्री. नितेशजी राणे यानी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची त्वरीत दखल घेतल्याबद्दल श्री. अशोक राणे व कर्मचारी वर्ग यानी आभार मानले आहेत.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा