You are currently viewing नुतन विद्यालय कळणे या प्रशालेत जागतिक मराठी भाषा दिवस साजरा

नुतन विद्यालय कळणे या प्रशालेत जागतिक मराठी भाषा दिवस साजरा

दोडामार्ग

साहित्यातील सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. दोडामार्ग तालुक्यातील नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत हा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्या.महेंद्र देसाई, शिक्षिका सौ.निकीता सावंत, संजय तायवाडे, संयोजक सतीश धर्णे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन केले. श्री.धर्णे यांनी यावेळी मराठी भाषा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 8 =